01:08am | Nov 24, 2018 |
कराड : ईदच्या मिरवणुकीमुळे येथील दत्त चौकात वाहतूक थांबविण्यात आली असताना एका स्कूटीवर पाठीमागे बसलेल्या वृध्दाला अचानक हार्टऍटॅक आला. त्यांचा तोल जाऊन ते खाली पडणार, इतक्यात बंदोबस्तावर असणार्या वाहतूक शाखेतील कॉ. पूजा पाटील यांनी क्षणार्धात त्यांना सावरले. गाडीवरून उतरवून त्यांना सावलीत बसविले. तसेच समवेतच्या मुलास वृध्दाला रिक्षातून हॉस्पीटलला नेण्यास सांगितले. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. या कार्यतत्परेबद्दल महिला पोलीस पूजा पाटील यांचे कौतुक होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, ईदमुळे बुधवारी संपूर्ण शहरात मोठा बंदोबस्त तैनात होता. सकाळी ईदची मिरवणूक सुरू होती. मिरवणूक दुपारी बाराच्या सुमारास येथील दत्त चौकात आली. मिरवणुकीमुळे वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली होती. त्याचवेळी एका स्कूटीवर पाठीमागे बसलेल्या वृध्दाचा तोल जात असल्याचे वाहतूक शाखेतील महिला पोलीस पूजा पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने त्यांना पकडले आणि गाडीवरून खाली उतरविले. त्यामुळे तेथे गर्दी झाली. वाहतूक शाखेचे सुरेश सावंत, विठ्ठल चव्हाण, नितीन जाधव यांच्यासह मलकापूरचे माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते दादा शिंगणही तेथे होते. कॉ. पूजा पाटील आणि शिंगण यांनी वृध्दासमवेत असणार्या मुलास गाडी बाजूला घ्यायला सांगितली. त्या वृध्दास बोलता येत नव्हते. उन्हामुळे कदाचित त्यांना चक्कर आली असावे, असे सर्वांना वाटले. त्यामुळे त्यांना गजानन हॉटेलच्या बाजूस असलेल्या झाडाच्या सावलीत बसविण्यात आले. मात्र, त्या वृध्दाचे शरीर थंड पडले. त्यामुळे कॉ. पूजा पाटील यांनी रिक्षा थांबवून वृध्दासमवेत असलेल्या मुलास त्यांना हॉस्पीटलला नेण्यास सांगितले. मुलाने त्या वृध्दास तातडीने कृष्णा हॉस्पीटलला नेऊन अॅडमीट केले. त्या वृध्दाला हार्टअॅटॅक आल्याचे निदान तेथे झाले. त्यामुळे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
वाहतूक शाखेच्या महिला पोलिसाने दाखविलेल्या या तत्परतेमुळे एक वृध्द गाडीवरून पडता-पडता वाचला आणि त्याला वेळेवर उपचारही मिळू शकले. याबद्दल कॉ. पूजा पाटील आणि त्यांचे सहकारी सुरेश सावंत, विठ्ठल चव्हाण, नितीन जाधव यांचा सामाजिक कार्यकर्ते दादा शिंगण यांनी बुके देऊन सत्कार केला. यावेळी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील प्रदीप कदम उपस्थित होते. दरम्यान, वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी देखील वाहतूक पोलिसांचे कौतुक केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |