कराड : येथील साईनाथ वडापाव सेंटर शेजारील चैतन्य कॉम्प्लेक्समधील प्लॉटमध्ये एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवारी) सकाळी 8 च्या सुमारास उघडकीस आली.
मोनिका रघू नायक (वय 25 रा. तटेली, ता. बेंलोर जि.आसन- कर्नाटक) असे संशयास्पद मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील साईनाथ वडापाव सेंटर शेजारील चैतन्य कॉम्प्लेक्समध्ये रघु नायक हा सिंगल रूममध्ये पत्नी व नऊ महिन्याच्या मुलासह मासिक भाडयाने राहत होता. तो याच कॉम्प्लेक्समधील बेंगलोर अय्यांगर बेकरीमध्ये कामास आहे. शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास पत्नी मोनिका ही गर्भवती असल्यामुळे तिला हॉस्पीटलमध्ये घेवून जातो असे अय्यांगर बेकरीचे मालक रूद्रकुमार वीरेगोडा अय्यांगर यास फोनवरून सांगितले. त्यानंतर दिवसभर रघु नायक याच्या रूमला कुलूप होते. दरम्यान, आज (शनिवारी) सकाळी 8 वाजता बेकरी मालक रूद्रकुमार अय्यांगर यांने रघु याला फोन केला असता त्याचा फोन बंद असल्याचे दिसून आले. त्यानंतर बेकरीमध्ये अंडाबेकींग करावयाचे असल्याने बेकरी मालकाने रघु याच्या रूममधील तीन गॅसची शेगडी घेण्यासाठी रूमचे कुलूप हातोडीने तोडले व दरवाजा उघडला असता रूममधून उग्र वास येवू लागला त्यावेळी पाहिले असता रघूची पत्नी मोनिका ही मयत अवस्थेत जमिनीवर पडल्याचे दिसून आले. याबाबतची खबर रूद्रकुमार अय्यांगर यांने कराड शहर पोलिसात दिली आहे. दरम्यान, मोनिका नायक हिचा मृत्यू संशयास्पद असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने वेगाने तपासाला सुरूवात केली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |