सातारा : अखिल मराठी भारतीय साहित्य महामंडळावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांची रविवारी ठाणे येथे झालेल्या बैठकीत संचालकपदी एकमताने निवड करण्यात आली. 1961 नंतर प्रथमच सातारा तालुक्याला संधी मिळाली असून साता-यात अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावे यासाठी अधिक जोमाने पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया विनोद कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर दरवर्षी एक प्रतिनिधी पाठवला जातो. महामंडळाची स्थापना 1961 साली झाली आहे. स्थापनेपासून सातारा तालुक्याला कधीच प्रतिनिधीत्व मिळाले नव्हते. पहिल्यांदाच विनोद कुलकर्णी यांच्या रुपाने महामंडळावर सातारा तालुक्याला प्रतिनिधीत्व मिळाले आहे. ठाणे येथे झालेल्या बैठकीत जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, जळगाव प्रतिनिधी तानसेन जगताप, पुण्याचे कार्यवाह वि.दा.पिंगळे यांनी विनोद कुलकर्णी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला. गेली सहा वर्षे महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहुपुरी शाखेतर्फे केलेले कार्य, सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये बजावलेली भूमिका याचा विचार करुन मसाप कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी विनोद कुलकर्णी यांना महामंडळावर पाठवण्याचा निर्णय घेतला.
त्याला प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यांनी पाठिंबा दर्शवला. गेली सहा वर्षे साता-यात अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. यावर्षी आपण प्रस्ताव पाठवलेला आहे. थेट महामंडळावर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे साता-यात संमेलन घेण्यासाठी अधिक जोमाने पाठपुरावा करता येईल अशी प्रतिक्रिया विनोद कुलकर्णी यांनी निवडीनंतर व्यक्त केली. या निवडीबद्दल साहित्य, सहकार, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |