10:56pm | Jun 08, 2018 |
फलटण : फलटण नगर परिषदेने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्याची वैयक्तीक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान या सदराखालील आयोजित कार्यशाळेत उपस्थित नागरीकांनी घरकुल योजनेचे लाभ देतो अशी दिशाभुल करून बोलविल्या बाबत प्रचंड असंतोष व्यक्त करीत मुख्यधिकारी,नगराध्यक्षा व नगरसेविका यांना चांगलेच धारेवर धरले. यावरून या कार्यशाळेत नागरीकांनीच प्रशासनाची शाळा घेतल्याच प्रत्येय आला.यावेळी फलटण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.निता नेवसे,मुख्याधिकारी धैर्यशिल जाधव,नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर, मधुबाला भोसले, प्रगती कापसे, वैशाली चोरमले, मलदसा कुंभार, ज्योती खरात केपीएमजी संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.
इंदीरा गांधी सांस्कृतीक भवन येथे दि.8 रोजी सकाळी 11 वा. प्रधानमंत्री आवास योजना विविध 4 घटकांतर्गत राबविण्यात येते त्यापैकी घटक क्र 4 आर्थिक दृष्ट्या दुबर्ल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तीक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान या घटकावर महिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजीत केली होती या वेळी फलटण मधील मंगळवार पेठ, दत्त नगर, शिवाजीनगर, लक्ष्मीनगर या भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. मुख्याधिकरी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केल्यानंतर केपीएमजी संस्थेचे अधिकारी यांनी ज्यांना स्वतःची जागा आहे,ज्यांना पक्की घरे नाहीत अशा लोकांसाठी ही योजना असल्याचे सांगितले यावर उपस्थित नागरीकांनी ज्यांना घरे नाहीत,स्वतःची जागा नाही अशा नागरिकांसाठी ही योजना नाही का असे म्हणत उपस्थित नागरीकांनी स्टेजच्या पुढे येवुन मुख्याधिकारी धैर्यशिल जाधव यांच्यावर अक्षरशा प्रश्नाची सरबत्ती सुरू केली व यावेळी एकच गोधळ उडाला यावर मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांनी उपस्थित नागरिकांना शांततेचे आवाहन केले पण या योजना फसव्या आहे,आपण भेेदभाव करीत आहात,ज्यांना घरांची खरी गरज आहे त्यांचे काय असे प्रश्न विचारू लागले. घटक योजना मधील इतर 1 ते 3 योजनाचे काय झाले अचानकपणे क्र 4 ची योजना कशी सुरू केली. जे नागरीक सरकारी जागेवर अनेक वर्षापासून राहत आहेत ज्यांच्या घराच्या नोंदी नगरपालिकेकडे आहेत व ते अनेक वर्षा पासून कर भरतात अशा नागरीकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतुन मिळणारी घरे कुठे गेली असा सवाल उपस्थित नागरीकानी मुख्याधिकार्यांना विचारला. यावर मुख्यधिकार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतुन लाभार्थ्याच्या याद्या जाहीर केल्या आहेत यातुनही जे नागरीक योजने पासून वंचीत राहीले आहेत अशा नागरीकानी कागदपत्रासह नगर परिषदेकडे अर्ज सादर करावेत. कोणत्याही नागरीकाला योजने पासून वंचीत ठेवले जाणार नाही असे मुख्याधिकारी यांनी सांगितले.
यांनतर दत्तनगर,लक्ष्मीनगर येथील उपस्थित नागरीकांनी मुख्याधिकारी व नगरसेविका यांना गटर, सार्वजनीक शौचालय, रोडलाईट या मुलभुत सुविधा मिळत नसले बाबत जाब विचारला यावर दत्तनगर भागात स्वःखर्चाने आपण गटारे करून देवु असे अॅड.सौ.मधुबाला भोसले यांनी सांगितले.
या कार्यशाळेसाठी नागरीकांनी उपस्थित रहावे म्हणुन शहरात रिक्षा,वृत्तपत्रे व नगरसेवकातर्फे नागरीकांना माहीती दिली गेली. पण नक्की योजनेचे स्वरूप लक्षात न आल्याने ही योजना कशासाठी व कोणासाठी लागु आहे हे लक्षात न आल्याने गैरजमजातुन ज्या नागरीकांना या योजनेचा लाभ होणार नाही अशा नागरीकांची मोठी गर्दी यावेळी झाली होती. यावेळी सुभाष गायकवाड, हरीष काकडे, अरूण खरात, संजय पवार आदींनी प्रशासनास प्रश्न विचारून धारेवर धरले. नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी शेवटी मध्यस्थी करत नागरिकांना शांत केले व मुख्याधिकारी यांना जे नागरिक शासकीय जागेत राहतात अशा नागरिकांना योजनेत लाभ कसा मिळेल, कोणते निकष लागू आहेत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सांगितले. यानंतर मुख्याधिकारी यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. परंतु मूळ ज्या योजनेच्या माहितीसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती ती कार्यशाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पार पडली नाही.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |