मुंबई : एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. एसटी कर्मचाऱ्यांना 2500 रुपये तर अधिकाऱ्यांना 5000 रुपये दिवाळी भेट मिळणार आहे.
याशिवाय एसटी अधिकाऱ्यांना 10 टक्के इतकी अंतरीम वेतनवाढ देण्याचा तसेच एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयही आज जाहीर करण्यात आला. एसटी कर्मचारी अडीच हजार आणि अधिकाऱ्यांना पाच हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळी भेट अधिकारी, कर्मचाऱ्यांना तातडीनं देण्यात यावी, अशा सूचना रावतेंनी दिल्या आहेत.
एसटी अधिकाऱ्यांना 10 टक्के अंतरीम वेतनवाढ
एसटी अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या 10 टक्के इतकी अंतरीम वाढ जाहीर केली असून ऑक्टोबर 2018 पासून ही वेतनवाढ लागू होईल. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच मोठी वेतनवाढ दिली आहे. याबाबत अभ्यास करुन महामंडळाला शिफारस करण्यासाठी मंत्रालयातील निवृत्त अधिकाऱ्यांची दोन सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. दोन महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करेल. समितीचा अहवाल येईपर्यंत अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या 10 टक्के इतकी अंतरीम वाढ करण्यात येत असल्याचे रावते यांनी जाहीर केले.
एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ
एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्येही वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार राज्य शासनाप्रमाणे एसटी अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 6 टक्के इतकी वाढ जुन्या वेतनानुसार करण्यात आली. ऑक्टोबर 2018 च्या वेतनापासून हा महागाई भत्ता देण्यात येईल.
एसटी कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पगारवाढीतील थकबाकीतील 5 हप्त्यांची रक्कमही दिवाळीनिमित्त येत्या 1 नोव्हेंबरला देण्यात यावी, असे आदेशही महामंडळाला दिवाकर रावते दिले आहेत.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |