कराड : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या दंतविज्ञान महाविद्यालयातर्फे कराड शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी बसस्थानक परिसरात आयोजित मौखिक आरोग्य तपासणी शिबीराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे अनेकांना तोंडाच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या मौखिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मृत्यू पावणार्या लोकांची संख्या जगभरात 64 लाख आहे. तर भारतात तंबाखू सेवनामुळे दररोज सुमारे 2500 आणि वर्षभरात सुमारे 10 लाख लोकांचा मृत्यू होतो. म्हणूनच जगभरातील जनतेला तंबाखूजन्य पदार्थ सेवनाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी दरवर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या दंतविज्ञान महाविद्यालयातर्फे कराड शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी पोस्टर्स आणि माहितीपत्रकांद्वारे लोकांना तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम, तोंडाच्या कर्करोगाची प्रारंभिक लक्षणे, कर्करोगाचे निदान व प्रतिबंध याबद्दल माहिती दिली.
यानिमित्ताने कराड बसस्थानकात प्रवाशांसाठी मोफत मौखिक आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. डी. डी. पाटील यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबीरात सुमारे 100 लोकांची दंत तपासणी करण्यात आली. तसेच तंबाखू निवारण्याचे उपाय सांगण्यात आले. दरम्यान तपासणीवेळी 50 लोकांमध्ये कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आढळून आली.
यावेळी कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या सामाजिक दंतशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.शिवकुमार के.एम., मौखिक शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ.निलेश मिश्रा, डॉ. पंकज पाटील, डॉ.प्रतिक्षा पन्हाळकर, डॉ.श्रीकांत पाटील, डॉ. शुभदा नलावडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |