RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या 'मराठा उद्यम विश्व' अंकाचे प्रकाशन

11 March 2019 at 00:23

मुंबई : राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांच्या उन्नतीसाठी राबविलेल्या अनेक योजनांचे संकलन असलेल्या 'मराठा उद्यम विश्व' या मासिकाच्या प्रथम अंकाचे प्रकाशन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते उपाध्यक्ष संजय पवार आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यरत आहे. महामंडळाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कर्ज व्याज परतावा योजना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना, महिला बचत गटांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज इत्यादी माध्यमातून सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

राज्यात उद्योग व्यवसाय उभारु इच्छिणाऱ्याना या माध्यमातून सहाय्य केले जात आहे. याची सर्व माहिती असलेले नियतकालिक यापुढे दरमहा प्रकाशित करण्यात येणार आहे. सदर अंक, माहिती नरेंद्र पाटील माथाडी डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. या अंकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा समाज बांधवांसाठी शासनाने आखलेल्या उपाययोजनां ची माहिती असलेला संदेश तसेच नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी तरुणांनी व्यवसायभिमुख कौशल्य प्राप्त करावे यावर भाष्य करणारे आवाहन नामदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे यांनी गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱयांना प्रशिक्षित करून राज्याला समृद्ध करण्याचा घेतलेला कार्यक्रम याची रूपरेषा तसेच युवा सक्षमीकरणाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल यावर उपाध्यक्ष संजय पवार यांनी आपले मत नोंदवले आहे.

मराठा तरुणांनी आपल्या पायावर उभे रहावे यासाठी महामंडळामार्फत असलेल्या विविध कर्ज योजना त्याची संपूर्ण माहिती अंकामध्ये देण्यात आली आहे. जेष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट शिशिर हिरे यांनी मराठा तरुणांनी व्यवसायाकडे वळायला हवे यावर आपले मत नोंदवले आहे.

या अंकामध्ये राज्यांमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या आणि उद्योग व्यवसाय यशस्वी झालेल्या समाज बांधवांची माहिती इतर इतरांना प्रेरणा मिळण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने बेरोजगार तरुणांना उद्यमशील बनवण्यासाठी तीन प्रकारच्या प्रोत्साहन योजना जाहीर केल्या असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू  आहे.   गरजू नवउद्योजकाला 10 लाखापर्यंत तर अथवा गटाला सरकारी कार्यालयाची पायरी न चढता 50लाखापर्यंतचे बिनव्याजी अर्थात व्याज परतावा योजनेतील कर्ज त्याला मिळू शकत आहे. मंडळाने विद्यमान योजना आणि आवश्‍यकतेनुसार नवनवीन बदल केले जात आहेत.

फक्त शेतकरी उत्पादक कंपनीसाठी (FPO) अर्थात फार्मर प्रोड्यूसर  कंपनीसाठी 78 समान हप्त्यात दहा लक्ष बिन व्याजी कर्ज देण्यात येत आहे. यावर बिनव्याजी कर्जाचा मासिक हप्ता केवळ 12,821/-  रुपये इतका आहे.

कोणताही व्यवसाय करताना आपल्या शहरात किंवा आपल्या भागात त्या व्यवसायाला किती संधी आहेत याचे सर्वेक्षण करून उद्योग सुरू करण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावेळी समाज बांधवाना केले आहे. मराठा समाजात उद्योजक निर्माण झाले पाहिजेत ही सरकारची प्रामाणिक इच्छा आहे यासाठी सरकारने सर्वोतोपरी प्रयत्न केल्याचे मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी प्रकाशन प्रसंगी सांगितले.

 


Anandrao s chavan

Poultry vevsay


महाआघाडीतल्या ५६ पक्षांच्या पराभवासाठी महायुतीचे पाच पांडव पुरेसे : मुख्यमंत्री

महाराष्ट्रात बोलघेवडे लोक खूप आहेत त्यातच हल्ली बारामतीचा पोपट खूप बोलू लागला आहे आमचे कपडे कोणीच काढू शकणार नाही पण तुमच्या अंगावर आता काही शिल्लकच राहिले नाही

16 hours before

धक्कादायक ! पत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सहसचिवाची आत्महत्या

मंत्रालयीन सहसचिवाने आपल्या पत्नीवर गोळीबार करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत असलेल्या विजय पवार यांनी घरगुती वादातून गुरुवारी रात्री पत्नीवर २ गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या

22 March 2019 at 16:05