कराड : महापुरुषांचे विचार डोक्यात घेवून समाजपरिवर्तनाच्या चळवळीत सर्वांनी उतरले तरच समाजाला पुढे येण्यात यश येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा या संदेशाचा खरा अर्थ जाणून घेवून सर्वांनी वाटचाल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कराड पंचायत समितीचे उपसभापती रमेश देशमुख यांनी केले.
ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्यावतीने आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात होते. यावेळी आनंदराव पाटील, संस्थेचे सचिव नेताजी थोरात, संभाजी जमाले, प्रा.विजय पाटील, मधुराणी थोरात यांची उपस्थिती होती.
देशमुख म्हणाले, घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज सर्वांसाठी एकच कायदा तयार झाला आहे. त्यांनी प्रतिकुल परस्थितीमध्ये पदव्या प्राप्त केल्या होत्या. त्यांच्या विचारांचा, कार्याचा आदर्श युवकांनी घेवून समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
थोरात म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारून विज्ञानाच्या जोरावर प्रगती करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. अंधश्रध्दांपासून दूर राहत शिक्षणाच्या आणि विज्ञानाच्या साह्याने प्रत्येकाने स्वतःचा जीवनस्तर उंचावून देशाच्या प्रगती मध्ये योगदान द्यावे. त्यांनी समतावादी, मानवतावादी व शांतताप्रिय समाजाच्या निर्मितीसाठी केलेला त्याग विचारात घेऊन त्यांच्या संदेशांचा अंगीकार केला पाहिजे.
सौ.मधुराणी थोरात यांनी प्रास्ताविक केले. दीपा पाटील व मृणाल गरुड यांनी स्वागत केले. हणमंत आवळे यांनी सुत्रसंचालन केले. किर्ती काजवे यांनी आभार मानले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |