RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

शाहूनगरमधील घुले बंधूंमुळे वाचले भेकराचे प्राण

20 June 2019 at 00:16

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यालगतच्या जंगलातून एक भेकर शाहूनगर परिसरात आले होते. त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चवल्याने ते गंभीर जखमी झाले. या भेकराला शाहूनगर येथे राहणार्‍या संतोष घुले आणि प्रकाश घुले या दोघांनी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले आणि त्याचे प्राण वाचवले. 

अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला शाहूगनर येथील रेणुकामाता मंदीर परिसरात घुले बंधू राहण्यास आहेत. सकाळी सहाच्या सुमारास कोणत्यातरी प्राण्याच्या ओरडण्याचा आवाज येवू लागल्याने संतोष आणि प्रकाश घुले हे दोघे घराच्या पाठीमागे आवाजाच्या दिशेने गेले असता त्यांना एक भेकर भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडल्याचे त्यांना दिसले. दोघांनीही क्षणाचा विलंब न करता कुत्र्यांना हुसकावून लावले आणि भेकराची सुटका केली. दरम्यान, कुत्र्यांच्या हल्ल्यात भेकर गंभीर जखमी झाले होते. त्याला पाणी पाजल्यानंतर संतोष घुले यांनी सातारा वन विभागाचे सुहास भोसले यांना ङ्गोन करुन जखमी भेकराबाबत माहिती दिली. 

काही वेळानंतर सुहास भोसले घुले यांच्याकडे आले आणि त्यांनी भेकर ताब्यात घेतले. यानंतर त्या भेकराला वनविभागाच्या कार्यालयात नेवून उपचार सुरु करण्यात आले. जखमा गंभीर असल्याने दोन- तीन दिवसाच्या उपचारानंतर भेकराला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येईल, असे भोसले यांनी सांगितले. भेकराचे प्राण वाचवल्याबद्दल भोसले व इतर नागरिकांनी घुले बंधुंचे अभिनंदन केले.

जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.

3 hours before

एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

कराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 hours before

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.

4 hours before

सातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

4 hours before