01:52am | Jun 12, 2019 |
सातारा : वाल्मिकी वधू वर सूचक मंडळाच्या माध्यमातून सातार्यातील महिलेला भुरळ पाडून, लग्नाचे खोटे आमिष दाखवून तब्बल 9लाख 95 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विनय राजेेश लोहिरे (वय 38, रा.मुंबई) या भामट्याला सातारा तालुका पोलिसांनी गजाआड केले. संशयिताने आणखी काही महिलांची फसवणूक केल्याची माहिती असून त्याच्याविरुध्द अशाचप्रकारचे पुणे जिल्ह्यातही इतर गुन्हे दाखल आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दिव्यनगरी, सातारा येथील एका महिलेची संशयित विनय लोहिरे याच्याशी वाल्मिकी वधू वर सूचक मंडळाच्या संकेतस्थळावर ओळख झाली होती. दोन ते तीन महिन्यांपूर्वी ओळख झाल्यानंतर संशयिताने महिलेशी जवळीक वाढवली. सुरुवातीला लग्नाचे आमिष दाखवल्यानंतर त्याने आजारासह विविध बहाणे सांगून महिलेकडून पैसे घेण्यास सुरुवात केली. संशयिताने टप्प्याटप्प्याने तब्बल 9 लाख 95 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर संशयिताने पैसे माघारी देतो, असे सांगत होता. मात्र पैसे परत देण्याऐवजी तो वेळोवेळी पैशांची मागणी करु लागला.
काही दिवसांनतर संशयित विनय लोहिरे याने महिलेशी संपर्क साधण्यास टाळाटाळ केली. संपर्कातील टाळाटाळ पैशाबाबत हात वर करत असल्याने महिलेने त्याला भेटण्याचा प्रयत्न केला असता त्याने चुकीचे पत्ते दिले असल्याचे महिलेच्या लक्षात आले. यातून महिलेने सातारा तालुका पोलिस ठाण्यात 24 मे 2019 रोजी विनय लोहिरेविरुध्द फसवणूकीची तक्रार दिली. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी जंगजंग पछाडले. मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता. सातारा पोलिस मुंबईत तळ ठोकून असताना सोमवारी त्याच्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. अखेर तो रात्री सापडल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केली.
संशयिताकडे प्राथमिक चौकशी केली असता तो मुलुंड मुंबई येथे महागड्या फ्लॅटमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे. हायफाय, पॉश राहणीमानामुळे त्याच्यावर कोणी संशय घेत नव्हते. दरम्यान, संशयितावर देवाची आळंदी, हडपसर येथील पोलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या महिलांची, युवतींची फसवणूक झालेली आहे त्यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्याशी किंवा नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |