03:34am | Dec 04, 2018 |
कराड : मलकापूर विकास साधताना माजी आमदार स्वर्गीय भास्करराव शिंदे उर्फ दादा यांनी प्रचंड संघर्ष केला. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली प्रत्येक विकास योजना त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत आहे. चोवीस तास पाणीपुरवठा योजना, प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा या योजनांनी मलकापूरला वेगाने पुढे नेले. या योजना म्हणजे भास्करराव शिंदे यांचे जिवंत स्मारक आहे, असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले.
मलकापूर येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार स्वर्गीय भास्करराव शिंदे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन व गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. आ.मोहनराव कदम अध्यक्षस्थानी होते. कराड जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, हिंदुराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य मंगला गलांडे, पंचायत समिती सदस्य वैशाली वाघमारे, इंद्रजित चव्हाण, उत्तमराव पाटील, शिवाजीराव पवार, श्रीरंग जगदाळे, बाळासाहेब कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष मोहनराव शिंगाडे, राजेंद्र यादव, माजी नगराध्यक्ष सुनीता पोळ, दत्ता पवार, सुनंदा साठे, कल्पना रैनाक आदी उपस्थित होते.
पृृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भास्करराव शिंदे यांनी मलकापूरसाठी घालून दिलेल्या विकासाच्या दिशेने मनोहर शिंदे यांची वाटचाल सुरू आहे. दादांचे कार्य नव्या पिढीला माहिती होणे गरजेचे आहे. दादांचे मलकापूरवर प्रचंड प्रेम होते. यातूनच त्यांनी मलकापूरचा विकासाचा ध्यास घेतला. प्रचंड कष्ट घेतले. त्यामुळेच तर आज शहर प्रचंड वेगाने विकासाच्या वाटेवर वाटचाल करत आहे. त्यांच्या संकल्पनेतून तयार झालेली चोवीस तास पाणीपुरवठा योजना जगाच्या नकाशावर पोहोचली आहे. या योजनांची माहिती संपूर्ण देशाला होण्यासाठी देशभरातील तज्ज्ञांना बोलून प्रत्येक योजनेचा स्वतंत्र अहवाल त्यांच्यासमोर मांडावा.
मनोहर शिंदे म्हणाले, दादांच्या विचारावर वाटचाल करताना शहरात विविध योजना यशस्वीपणे सुरू आहेत. विकासासाठी कार्य करत असताना अनेक घटकांचे सहकार्य लाभले. नगरपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर करत अनेकांनी आडकाठी घातली. बाबांच्या पाठबळामुळे आज नगरपरिषद अस्तित्वात आली. नगरपरिषद झाल्याने बाबांच्या ताकदीची कल्पना येते. दादांच्या स्वप्नातील मलकापूर निर्माण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. दादांच्या नंतर माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण बाबांनी मलकापूरचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यामुळे मलकापूरच्या विकासाआड येणारी प्रवृत्ती बाजूला सारून आम्ही शहराच्या विकासासाठी कटीबद्ध आहोत, असे मनोहर शिंदे यांनी सांगितले. अजितराव चिखलीकर, हिंदुराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कोमल कुंदप यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र यादव यांनी आभार मानले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |