03:55pm | Apr 07, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात नागरिकांनी बाहेर पडू नये असे वारंवार आवाहन करूनही पोलिसांच्या या आवाहनाला न जुमानता घराबाहेर पडणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून सातारा जिल्हा पोलिसांनी आज पर्यंत ६१ चारचाकी वाहनांवर तर १३३९ दुचाकी वाहनांवर धडक कारवाई केली असल्याची माहिती सातारा जिल्हा पोलिस दलातील सूत्रांनी दिली.
सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासन आणि सातारा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असताना या उपाययोजनांना छेद देण्याचा प्रयत्न काही अपप्रवृत्ती कडून होत आहे. मुळात प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपून आपापल्या घरीच राहण्याची अत्यंत गरज असताना सातारा जिल्ह्यामध्ये विनाकारण दुचाकी-चारचाकी वाहने फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा अपप्रवृत्तींना पोलिसांनी वारंवार प्रेमाने आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने आता कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. अशा अपप्रवृत्तींवर गुन्हे दाखल करणे, त्यांच्या दुचाकी-चारचाकी वाहने जप्त करणे अशी मोहीम हाती घेण्यात आली असून आज अखेर सातारा जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांची संख्या ६१ तर दुचाकी वाहनांची संख्या १३३९ झालेली आहे. तरी नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी कोणत्याही प्रकारे आपले वाहन बाहेर काढू नये अन्यथा ते जप्त करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
खुष्कीचे मार्ग केले बंद...
उपनगरातून सातारा शहरात येण्यासाठी व सातारा शहरातून उपनगरात जाण्यासाठी अनेक खुष्कीचे मार्ग आहेत. या मार्गावर तेथील स्थानिक ग्रामस्थांनी व पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले असून असे बहुतांशी मार्ग स्थानिक नागरिकांच्या मदतीने बंद करण्यात आल्यामुळे आता सातारामध्ये वाहनाने शिरकाव करणे सोपी गोष्ट राहिली नाही. वाडे फाटा बॉम्बे रेस्टॉरंट चौक शिवराज पेट्रोल पंप मार्ग आणि अजंठा चौकात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अत्यंत गरजेचे असेल तरच वाहनचालकांना सातारा शहरांमध्ये प्रवेश दिला जात असल्यामुळे विनाकारण वाहनाने फिरणाऱ्या अपप्रवृत्तींना चांगलाच चाप बसला आहे.
गुड मॉर्निंग ठरतेय बॅड मॉर्निंग...
पहाटेच्या वेळी, सकाळी कोणीही फिरण्यासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस सातत्याने करत आहेत. मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करून काही सातारकर नागरिक पहाटेच्या वेळी स्वच्छ हवा खाण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. काही हौसे नागरिक तर घरातील कुत्र्या समवेत फिरण्यासाठी बाहेर पडत असल्यामुळे पोलिसांसाठी ही गोष्ट त्रासदायक ठरू लागल्यामुळे भल्या पहाटे पोलिसांनी फिरण्याच्या ठिकाणी अचानक भेटी देऊन अनेकांच्या गुड मॉर्निंग बॅड मॉर्निंगमध्ये बदलून टाकल्यामुळे घराबाहेर फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे मिळालेल्या माहितीनुसार यापुढे फिरण्यासाठी घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |