11:29pm | Apr 25, 2019 |
वाई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने दि. २१ ते २३ एप्रिल हे तीन दिवस ड्राय डे घोषित केला होता. या कालावधीत वाई मधील सर्व वाईन शॉप, बिअर बार व देशी दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तरीही रात्रीच्या वेळी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोरून तिप्पट किमतीने देशी विदेशी मद्याची विक्री केली जात होती. तीन दिवसात सर्वाधिक मद्य विकले गेल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक या कालावधीत कुठे गेले होते ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून या विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाई तालुक्यात विशेषतः पश्चिम भागात अवैधरित्या दारू विक्री केली जात असल्याची चर्चा सुरू असतानाच ड्राय डे दिवशी मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू छुप्या पद्धतीने विकली गेल्याने व्यसन मुक्ती चळवळीतील कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. उत्पादन शुल्क विभागाने दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते दि. २३ एप्रिल पर्यंत सर्व वाईन शॉप, बिअर बार, बिअर शॉपी व देशी दारूचे दुकानांना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील सर्व संबंधित दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तरीही त्या तीन रात्री शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी काहीजण देशी विदेशी मद्य चोरून विकत होते. मॅकडॉल, ब्लॅक डीएसपी, रॉयल स्टॅग, तसेच बिअर व देशी दारू दुप्पट ते तिप्पट किमतीने विकली जात होती. तीन दिवसात मोठ्या प्रमाणात मद्य विक्री झाली असून हे सर्व मद्य कोठून आले याविषयी सध्या शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. निवडणुकीच्या कालावधीत जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथके जिल्ह्यात तैनात करण्यात आली होती. वाईतही ही भरारी पथके लक्ष ठेऊन होती. तरीही तीन दिवसात मोठ्या प्रमाणात मद्य विक्री होत असल्याचे या पथकाच्या निदर्शनास का आले नाही? याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी ही मांढरदेव यात्रा कालावधीत शहरातील दुकाने तीन दिवस बंद असतानाही त्यावेळी चोरून मोठ्या प्रमाणात दारू विक्री करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यावेळी उत्पादन शुल्क विभागाचे पथक वाईमध्ये तळ ठोकून होते. मात्र त्यावेळीही कोणावरही कारवाई झाल्याची नोंद नाही.
पश्चिम भागात अवैधरित्या दारू विक्रीचा प्रश्न सातत्याने चर्चेला जात असून खावली, व अन्य काही गावातील देशी विदेशी दारू मोठ्या प्रमाणावर विकली जाते. विक्री करणाऱ्या संबंधित लोकांवर पोलिसांनी अनेकवेळा छापे टाकून कारवाई केली आहे. तरीही राजरोसपणे या ठिकाणी दारू विक्री होत आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अखत्यारीतील हे काम असताना हा विभाग आपली जबाबदारी का झटकतो आहे. या विषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्पादन शुल्क विभागाकडून अशा अवैधरित्या विक्रीवर कारवाई करण्याच्या सक्त सूचना द्याव्यात अशी मागणी व्यसनमुक्ती चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |