02:38am | Jan 19, 2020 |
सातारा : सातारा पोलीस दलामार्फत सुरु असलेल्या सागरिका पोलीस कॅन्टीनमध्ये नव्याने सुरु करण्यात आलेल्या अभिनव अशा इलेक्ट्रॉनिक वस्तु विक्री दालनामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तुंवर पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना 45 ते 50 टक्क्यापर्यंत सुट मिळत आहे यामुळे त्यांना आर्थिक मदत होत असल्याने सातारा पोलीस दलाचा कॅन्टीनचा स्तुत्य उपक्रम राज्यभर राबविणार असल्याचे प्रतिपादन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज केले.
पोलीस दलामार्फत येथील पोलीस करमणुक केंद्रामार्फत चालविण्यात येणाऱ्या पोलीस कॅन्टीचे नुतनीकरण करण्यात आले आहे याचे व नव्याने सुरु करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तु विक्री दालनाचे उद्घाटन आज गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते सहा. पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते.
सातारा पोलीस दलाने इलेक्ट्रॉनिक वस्तु विक्रीचे दालन सुरु करुन अधिकारी, कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत केली असल्याचे सांगून यापुढे ज्या ज्या जिल्ह्यात जाईन त्या ठिकाणी पोलीस कॅन्टीनची माहिती घेऊन सातारा पोलीस दलाने सुरु केलल्या उपक्रमांची माहिती देऊन याच धर्तीवर कॅन्टींन चालविण्यासाठी सांगणार असल्याचेही श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले. सातारा पोलीस दलाचा हा उपक्रम आदर्शवत असून या उपक्रमाला त्यांनी शेवटी शुभेच्छाही दिल्या.
कमीत कमी दरामध्ये पोलीस विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दैनंदिन वस्तु मिळाव्यात हा या पोलीस दलाच्या कॅन्टींनचा उद्देश आहे. 25 हजार ते 30 हजारापर्यंत सागरिका कॅन्टींनमधल्या वस्तुची विक्री होत होती आता या कॅन्टीनमधील वस्तुंची विक्री 1 लाख ते 1 लाख 500 हजारापर्यं दररोज होत आहे. या कॅन्टींनमध्ये आणखीन वस्तु वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून हे कॅन्टींन माजी सैनिकांसाठी उपलब्ध असून माजी सैनिकांनी येताना ओळखपत्र घेऊन यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या उद्घाटन कार्यक्रमात केले.
प्रारंभी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांनी सागरिका पोलीस कॅन्टीनची पाहणी केली यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांनी कॅन्टीन माहिती दिली. या कार्यक्रमास पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |