सातारा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांना 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अखेर गुरुवारी जामीन झाला असून पुढील तपासात सहकार्य करण्यासाठी लाचलुचपत विभगात (एसीबी) आठवड्यातून एकदा हजेरी लावण्याचे आदेश न्यायाधिशांनी दिले आहेत. दरम्यान, पुनीता गुरव यांच्यावर 10 हजार रुपये घेताना सोमवारी ‘ट्रॅप’ झाल्यानंतर त्याचवेळी आणखी 80 हजार रुपयेही सापड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सातारा लाचलुचपत प्रतिबंध तथा एसीबीने सोमवारी सांयकाळी प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांना लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली. वेतनश्रेणी फरक बिल काढून तो मंजूर करण्यासाठी तक्रारदार शिक्षकाकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव व महाबळेश्वरच्या गट शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांना भेटले असता दोघांनी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार शिक्षकाने सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार केली. सोमवारी कारवाई झाल्यानंतर एसीबीने लाचेचे दहा हजार रुपये जप्त केले. यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करत असतानाच एसीबीला पुनीता गुरव यांच्या ड्रॉवरमध्ये आणखी 80 हजार रुपये सापडले. या घटनेने एसीबीचे पोलिस अधिकारी व कर्मचारी आणखी चक्रावून गेले. प्रोसिजरनुसार एसीबी विभागाने ते 80 हजार रुपयेही ताब्यात घेवून एकूण 90 हजार रुपये जप्त केले आहेत.
पुनीता गुरव यांना सोमवारी अटक केल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर केले असता गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. गुरुवारी पोलिस कोठडी संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांना त्यांना जामीन मंजूर केला. मात्र अद्याप वंदना वळवी पसार आहेत तसेच या घटनेचा तपास शिल्लक असल्याने न्यायाधिशांनी पुढील तपासासाठी पुनीता गुरव यांना आठवड्यातून एकदा एसीबी विभागात हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पोनि अरिफा मुल्ला या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |