सातारा : कोयना परिसरात उघडीप दिलेल्या पावसाने नऊ दिवसानंतर हजेरी लावली. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात ९८.५७ टीएमसी इतका साठा आहे.
जून महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाला. पश्चिम भागासह पूर्वेकडेही पावसाने दमदार हजेरी लावली. तर जुलै महिन्यापासून सतत दोन महिने पाऊस पश्चिम भागात पडत होता. संततधार पावसामुळे धरणे वेळेत भरली.
धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी वेळोवेळी पाणी सोडण्यात आले. तर कोयना धरणात १०४ टीएमसीच्यावर साठा झाला होता. मात्र, सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने पाणीसाठा १०० टीएमसीच्या खाली आला आहे. त्यातच गेल्या १८ सप्टेंबरपासून पावसाने कोयना धरण परिसरात पूर्णपणे उघडीप दिली होती. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी सुरू होती. असे असतानाच बुधवारपासून कोयना धरण परिसरात पाऊस सुरु झाला आहे.
गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १७ तर यावर्षी आतापर्यंत ५३४९ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. धरणात ९८.५७ टीएमसी साठा असून ८२२ क्युसेकची आवक होत असून ११०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
कोयनेप्रमाणेच नवजा येथेही अनेक दिवसानंतर पावसाने हजेरी लावली आहे. २४ तासांत नवजा येथे ९ तर आतापर्यंत ५९२१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. महाबळेश्वरला पावसाची नोंद झाली नाही. तेथे आतापर्यंत ५१०१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पूर्व भागातील माण तालुक्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |