01:28am | Sep 10, 2019 |
फलटण : लोणंद बारामती ह्या नव्याने सुरू होणाऱ्या रेल्वे मार्गावरील लोणंद ते फलटण या मार्गावर बुधवार दि 11 पासून होणार आहे. याचे उद्घाटन माजी खा. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. फलटणकरांचे रेल्वेचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण होईल अशी माहिती सोलापूर विभाग रेल्वे मंडळचे अध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर व माझ्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. फलटण रेल्वे सुरू व्हावी यासाठी माजी खासदार लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी 1996 पासून लढा उभारला होता. व ते स्वतः खासदार असताना त्याबाबत संसदेमध्ये आवाज उठवला होता. परंतु नंतर सरकार बदलल्यानंतर फलटणच्या रेल्वेकडे दुर्लक्ष केले गेले होते. नुकत्याच झालेल्या माढा लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत मी तातडीने रेल्वे सुरू करण्याचा दिलेला शब्द अखेर पाळला आहे. असे खा . रणजितसिंह नाईक-निंबाळकर पत्रकार परिषदेदरम्यान यांनी स्पष्ट केले. रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि रेल्वे अधिकारी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे लोणंद ते फलटण अशी डिझेल वर चालणारी रेल्वे गाडी सुरू करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून मध्य रेल्वेच्या मुंबई येथील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे दि 11 पासून फलटण ते लोणंद रेल्वे सुरू होणार आहे. त्यानंतर टप्प्या टप्प्याने फलटण ते पुणे फलटण ते कोल्हापूर रेल्वे सेवा सुरू करणार आहे. फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाचे भुसंपादनाचे काम लवकर सुरू होणारअसून यासाठी निधीची तरतूद करण्यात येत असून राज्य सरकार कडूनही यासाठी निधी मिळवायचा प्रयत्न सुरू आहे.
ज्यांनी रेल्वेचे स्वप्न पाहिले ती फलटणकर जनता आणि माजी खा. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार असून, यासाठी फलटण, बारामती, खंडाळा, माळशिरस तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, नेते मंडळी, रेल्वे अधिकारी निमंत्रित करण्यात आले आहे. लोणंद वरून फलटण कडे येण्यासाठी दिवसभरात रेल्वेच्या दोन फेऱ्या होणार असून वरील रेल्वेगाड्या रविवार सोडून सर्व दिवशी चालू राहणार आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |