RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

कोरेगावात हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

20 September 2018 at 01:03

१ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त

सातारा : कोरेगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील दरबार कलेक्शनच्या पाठिमागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पथकाने परिवेक्षाधीन पोलीस उप अधीक्षक मिलींद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा मारुन कोरेगाव शहरासह तालुक्यातील अनेक व्हाईट कॉलर प्रतिष्ठांना बेड्या ठोकल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

काल दि. 18 रोजी संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक मिलींद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी कोरेगाव शहरातील मुख्य रस्त्यावर असणार्‍या दरबार कलेक्शनच्या पाठिमागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारुन जुगार खेळत असलेले कोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय झंवर, कोरेगाव शहरातील ज्येष्ठ विधीज्ञ आणि सातारा जिल्हा बँकेचे माजी संचालक ऍड. जयवंतराव केंजळे यांच्यासह नऊजणांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर बिगर परवाना पैशांवर पत्ते, जुगार खेळत असल्याप्रकरणी सर्व संशयित आरोपींना अटक करुन काल दि. 18 रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान योग्य व लायक जामीनदार दिल्यामुळे संशयित आरोपींची मुक्तता करण्यात आली. काल ज्या जुगार अड्ड्यावर एलसीबीच्या पथकाने छापा मारला, तो जुगार अड्डा गेल्या 35 वर्षापासून सुरु आहे. याठिकाणी नियमितपणे जुगार खेळला जात होता. मात्र संबंधित जुगार अड्डा कोरेगाव तालुक्यातील एका मातब्बर राजकीय पुढार्‍याकडे भाडेतत्वावर दिला असल्याने गेल्या 35 वर्षात कोरेगाव पोलीसांनी या जुगार अड्ड्याकडे साधे ढुंकूनही पाहिलेले नाही. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारल्यामुळे कोरेगावातील अनेक महिलांनी आनंद व्यक्त केला आहे. जुगार अड्ड्यावर धाड पडल्यानंतर जुगार खेळणारे कोरेगावातील राजकीय बाहुबली, व्हाईट कॉलर, बडे व्यापारी अशांची पाचावर धारण बसली. अनेकांनी त्या ठिकाणावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तगडी फिल्डिंग लावल्यामुळे कोणीही जागचा हलला नाही. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह मोबाईल व इतर साहित्य असे मिळून सुमारे 1 लाख 9 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, काल संध्याकाळी सहा वाजता या जुगार अड्ड्यावर छापा मारल्यानंतर गुन्हा दाखल होण्यास सुमारे पाच तासांचा अवधी लागला. सातारा पोलिसांवर गुन्हा दाखल करताना प्रचंड राजकीय दबाव होता. या कारवाईबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळल्यामुळे आज दुपारपर्यंत या घटनेबाबत कोणालाच काहीही माहित नव्हते. मात्र या व्हाईट कॉलर जुगार्‍यांना वाचविण्यासाठी सातारा पोलीस अधीक्षकांसह कोरेगावच्या पोलीस निरीक्षकांकडे ही कारवाई दाबण्यासाठी अनेकांचे फोण खणाणले. मात्र पोलिसांनी या पुढार्‍यांना भीक घातली नसल्याने या जुगार्‍यांवर केलेल्या कारवाईची चर्चा दिवसभर जिल्हाभरात होती. लोकांना उपदेशांचे डोस पाजणारेच अनेक व्हाईट कॉलर व राजकीय पुढारी जुगार खेळताना सापडल्याने अनेकांची या निमित्ताने पोल खोल झालेली आहे. आपण काय करतोय, याचे भान संबंधित पुढार्‍यांना असायला हवे होते, अशी चर्चा कोरेगाव तालुक्यातील सूज्ञ मतदारांमध्ये आहे.

 

जुगार्‍यांना वाचविण्यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची फिल्डिंग

काल संध्याकाळी कोरेगावातील जुगार अड्ड्यावर छापा मारल्यानंतर कोरेगावात खळबळ उडाली. प्रामुख्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे पुढारी या छाप्या दरम्यान सापडले. आपण गोत्यात आलो आहे, हे समजताच संबंधितांनी आपापल्या गॉड फादरला स्वत:ला वाचविण्यासाठी साकडे घातले. त्यानंतर थेट विधीमंडळातून फलटण नरेशांचाही पोलीसांना फोन गेला. स्थानिक आमदारांपासून जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपल्या शिलेदारांना वाचविण्यासाठी मोठे लॉबिंग केले. मात्र, सातारा पोलिसांसमोर त्यांची डाळ शिजली नाही. अखेर काल रात्री उशीरा याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.

5 hours before

एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

कराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 hours before

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.

5 hours before

सातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

5 hours before