हैदराबाद : आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्स संघ पोहोचला आहे. आता चेन्नई आणि दिल्ली यापैकी कुणाला फायनलचं तिकीट मिळतंय याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, हैदराबादमध्ये रंगणाऱ्या फायनल लढतीची तिकीटं अवघ्या दोन मिनिटांत विकली गेली आहेत. सर्व तिकीटे दोन मिनिटांत कशी विकली गेली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आयपीएलची फायनल लढत १२ मे रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर रंगणार आहे. बीसीसीआयनं बुधवारी तिकीटांची विक्री सुरू केली. विशेष म्हणजे, त्याची पूर्वकल्पनाही दिली नाही. तरीही अवघ्या दोन मिनिटांत सर्व तिकीटे विकली गेली. त्यामुळं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारी समितीच्या एका सदस्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'फायनल लढतीची तिकीटे काही मिनिटांतच कशी विकली गेली? हे आश्चर्यकारक आहे. याबद्दल बीसीसीआयला फायनल लढत बघण्याची इच्छा असलेल्या चाहत्यांना उत्तर द्यावं लागेल,' असं तो सदस्य म्हणाला.
हैदराबादच्या या मैदानाची प्रेक्षक क्षमता ३९ हजार आहे. एरवी २५ ते ३० हजार तिकीटांची विक्री होते. मात्र, यावेळी सर्व तिकीटे कशी विकली गेली? याचं उत्तर अनेकांना मिळालं नाही. सूत्रांनुसार, १०००, १५००, २०००, २५००, ५०००, १००००, १२५००, १५०००, २२५०० रुपये किंमतीच्या तिकीटांची विक्री होणार होती. मात्र, 'एव्हेंट्स नाऊ'नं १५००, २०००, २५०० आणि ५००० रुपये किंमतीची तिकीटे विकली. अन्य १२५००, १५०००, २२५०० रुपये किंमतीच्या तिकीटांचं काय झालं, असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत इव्हेंट्स नाऊच्या सुधीर रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत कोणतीही माहिती देऊ शकत नाही. आम्हाला जी तिकीटे मिळाली होती, ती विकली. यासंदर्भात बीसीसीआय उत्तर देईल, असं त्यांनी सांगितलं.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |