02:41am | Jan 22, 2019 |
कराड : मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री आणि धनगर समाजाचे नेते नामदार महादेव जानकर यांनी मलकापूरात काढलेल्या प्रचारयात्रेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. आपल्या प्रचार दौर्यात त्यांनी मलकापूरातील नागरिकांना घरोघरी भेटून भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे यांच्यासह भाजपा व मित्रपक्षांच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या प्रचारदौर्यामुळे मलकापूरातील समस्त धनगर समाजामध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
सकाळी 11 च्या सुमारास मंत्री महादेव जानकर यांचे मलकापूरात आगमन झाले. तेथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्यासमवेत य. मो. कृष्णा सहकार साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष नामदार डॉ.अतुल भोसले, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ.सारिका गावडे, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबा गावडे आदी मान्यवरांनी घरोघरी भेटी देत भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. डॉ. सारिका गावडे यांच्या निवास्थानापासून सुरू असलेली ही पदयात्रा आहिल्या चौकमार्गे बिरोबा मंदिर येथे पोहचली. तिथे श्री बिरोबाचे दर्शन घेतल्यानंतर पुढे आबा गावडे यांच्या निवासस्थानी पदयात्रेचा समारोप करण्यात आला. याठिकाणी मंत्री जानकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन केले.
यावेळी शेतीमित्र अशोकराव थोरात, उमेदवार मनोज येडगे, उमा शिंदे, अश्विनी हिंगसे, स्वाती पवार, शामराव शिंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |