RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

भारताचा 'भीष्म' देणार पाकलगत सीमेवर पहारा

07 May 2019 at 15:33

ताफ्यात ४६४ अतिरिक्त टी-९० 'भीष्म' रणगाडे होणार दाखल

नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या ताफ्यात ४६४ अतिरिक्त टी-९० 'भीष्म' रणगाडे दाखल होणार आहेत. त्यासाठी भारत सरकारनं रशियासोबत १३,४४८ कोटी रुपयांचा संरक्षण करार केला आहे. हे सर्व रणगाडे २०२२-२०२६ या कालावधीत भारतीय लष्कराला मिळतील. ते सर्व पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहेत. दुसरीकडे पाकिस्तानही रशियासोबत ३६० रणगाडे मिळवण्यासाठी एका सुरक्षा करारावर चर्चा करत आहे. 

भारतीय लष्करात नव्याने येणारे हे टी-९० भीष्म रणगाडे अद्ययावत असतील आणि त्यांची निर्मिती भारतातच होईल. संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनुसार, यासंबंधी रशियाकडून महिनाभरापूर्वीच 'एक्विझिशन लायसेन्स'ला मंजुरी मिळाली आहे. रणगाड्यांच्या निर्मितीसाठीचे 'इंडेंट' (मागणी पत्र) लवकरच ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डांतर्गत चेन्नईतील अवाडी हेवी व्हेइकल फॅक्टरीकडे (एचव्हीएफ) असेल. 

लष्कराच्या ६७ बख्तरबंद रेजिमेंटमध्ये आधीपासूनच १०७० टी-९० रणगाडे, १२४ अर्जुन आणि २४०० जुने टी-७२ रणगाडे आहेत. सुरुवातीचे ६५७ टी-९० रणगाडे २००१ रोजी रशियाकडून घेतले होते. तर अन्य १००० रणगाड्यांच्या निर्मितीचा परवाना घेतल्यानंतर ते एचव्हीएफमध्ये तयार करण्यात आले होते. 

रात्रीच्या अंधारातही भिडण्याची क्षमता 

या नव्या रणगाड्यांमध्ये रात्रीच्या अंधारातही लढण्याची क्षमता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ४६४ रणगाड्यांच्या 'इंडेंट' प्रक्रियेला विलंब झाला आहे. ती पूर्ण झाल्यानंतर ६४ रणगाडे ३०-४१ महिन्यांत भारतीय लष्कराला मिळणे अपेक्षित आहे. 

माजी केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ भाजप नेते अरुण जेटली यांचे निधन

माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचे आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश

yesterday

अखेर चिदंबरम अटकेत

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर बुधवारी दिवसभराच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर रात्री दहा वाजता सीबीआयने अटक केली. अटक टाळण्यासाठी चिदंबरम यांनी दिवसभर प्रयत्न केले.

22 August 2019 at 14:18