सातारा : सातारा तालुक्यातील सोनगाव येथे गुरुवारी मध्यरात्री तीन ठिकाणी सात जणांच्या टोळक्याने कोयता, लाकडी दांडक्याच्या सहाय्याने धुडगूस घालत दरोडा टाकला. एका घटनेत आई व मुलाला दरोडेखोरांनी मारहाण केली असून हजारो रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी चोरून नेला. सातारा शहरालगत ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अर्चना नारायण शिंदे (वय 50, रा.सोनगाव) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी रात्री नेहमीप्रमाण शिंदे कुटुंबीय झोपी गेले होते. मध्यरात्री दीड वाजता अर्चना शिंदे यांना जाग आल्यानंतर घरातील दरवाजे उघडे असल्याचे लक्षात आले. झोपेतून उठून दरवाजा लावण्यासाठी गेल्या असता खिडकी बाहेर सात जण बोलत थांबल्याचे त्यांना दिसले. या घटनेने त्या घाबरल्या त्याच क्षणी दरोडेखोरांनी त्यांना पाहिले. संशियत आरोपींनी महिलेच्या गळ्याला धारदार कोयता लावून मंगळसूत्र जबरदस्तीने चोरले. आरडाओरडा झाल्यानंतर या घटनेने शिंदे यांचा मुलगा प्रतीक याला जाग आली. त्याने दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर दरोडेखोरांनी त्यालाही मारहाण केली. या सर्व प्रकारामुळे परिसरातील इतर ग्रामस्थ जागे झाले.
परिसरातील इतर घरांमध्ये लाईटी लागू लागल्यानंतर दरोडेखोर घाबरले. त्यांनी तेथून पोबारा केला. शिंदे कुटुंबियांनी घडलेल्या घटनेची माहिती शेजार्यांना दिल्यानंतर खळबळ उडाली. ग्रामस्थांनी घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत संशयित दरोडेखोरांनी सूरज अरुण शिंदे व विलास पांडूरंग शिंदे यांची बंद घरे फोडून त्यातून साखरेचे पोते, रोख रक्कम चोरी केली असल्याचे पुढे आले. पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी श्वान पथक, ठसे तज्ञ घटनास्थळी पाठवले.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |