कराड : मलकापूर नगरपरिषदेच्यावतीने दि. 15 सप्टेंबर ते 2 आक्टोंबर 2018 अखेर स्वच्छता हीच सेवा अभियान हाती घेण्यात आले होते. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधुन स्वच्छता महारॅलीचा समारोप आज (मंगळवारी) ढेबेवाडी फाटा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास तहसिलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, पोलिस उपनिरीक्षक संभाजी गायकवाड, महामार्ग पोलिस उपनिरीक्षक अस्मिता पाटील, नगराध्यक्षा सौ. सुनिता पोळ , उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छता महारॅली मलकापूर शहरातील लक्ष्मीनगर, आगाशिवनगर, शास्त्रीनगर, यशवंतनगर, खंडोबानगर या भागातून काढण्यात आली. या रॅलीचा समारोप ढेबेवाडी फाटा येथे करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली यावेळी भारती विद्यापीठ, रोटरी प्राथमिक शाळा, नूतन मराठी प्राथमिक शाळा, हौसाई कन्याशाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले व नाटीका सादरीकरण केले.
यावेळी बोलताना मनोहर शिंदे म्हणाले कि, मलकापूर नगरपरिषदेनेे स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये भरीव काम केले असून स्वच्छ सर्वेक्षण 2019 करिता सर्व नागरिकांनी आपले योगदान दिले पाहिजे. यासाठी नागरिकांच्यात जनजागृती करणे आवश्यक असुन त्यासाठी महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तहसिलदार राजेश चव्हाण म्हणाले, मलकापूर नगरपरिषदेने स्वच्छतेबाबत उल्लेखनिय काम केले आहे. यापुढेही स्वच्छतेबाबत लोकसहभागाच्या माध्यमातून काम करावे. या महारॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग होता.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |