कराड : केरळमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे बाधित झालेल्या जनतेला योग्य वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलचे आरोग्य पथक केरळला रवाना झाले. या आरोग्य पथकात 15 जणांचा समावेश असून, हे पथक 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत केरळ राज्यातील विविध पूरबाधित गावांमध्ये जाऊन वैद्यकीय सेवा व औषधोपचार सुविधा पुरविणार आहेत.
केरळमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे या राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या महापूरात शेकडो लोक मृत्युमुखी पडले असून, लाखो लोक विस्थापित झाले आहेत. या पूरबाधित जनतेला जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णा हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकी जपत आपले 15 जणांचे आरोग्य पथक केरळला पाठविले आहे. या पथकात डॉ.डॅनी जॉन, डॉ.मनू के., डॉ.जयकुमार के., डॉ.श्रीजिथ जी.एस., डॉ.साबू संदर्शन, डॉ.पूजन पटेल, डॉ.अजय आनंद, डॉ.अश्विनी, अनिल वर्घसे, अनूप चाको, निजू थॉमस, मोहन नायर, सचिन दमामे, सद्दामहुसेन सिराज व वैभव साळुंखे यांचा समावेश आहे. 15 जणांचे हे आरोग्य पथक केरळ राज्यातील रान्नी, मल्लापल्ली, चेनगन्नूर, हरिपाद, वियापुरम, थिरूवला या भागात आरोग्य तपासणी शिबीराच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देणार आहेत.
याप्रसंगी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले, विनायक भोसले, वैद्यकीय संचालक डॉ.ए.वाय. क्षीरसागर, डॉ.संजय पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ.विश्वास पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |