06:48pm | May 20, 2018 |
सातारा : घराच्या कौलावरून पडल्यानंतर पोटात लोखंडी गज घुसल्याने भगत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना आठ वर्षाच्या सलोनीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शेतकरी भगत कुटुंब आर्थिक विवंचनेत असताना माणुसकीची भिंत गेल्या काही तासात उभा राहिली आणि मदतीचा ओघ सुरु झाला. आ. शिवेंद्रराजेंचे कट्टर समर्थक व माजी जिप.सदस्य राजू भोसले यांनी सलोनीच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी घेत कुटुंबाला आधार दिला. जिप.चे माजी अर्थ व शिक्षण सभापती सुनिल काटकर, उद्योजक मारुती जाधव, बालाजी संस्थेचे राजेंद्र चोरगे यांनी सलोनीची माहीती घेत मदत देण्याचे कबुल केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळी भागातील कातवडी येथील चंद्रकांत भगत यांची आठ वर्षाची सलोनी पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून कौलारू घर दुरुस्तीला मदत करत होती. दुरुस्ती करत असताना अचानक सलोनीच्या पायाखालील लाकडी पट्टी तुटली आणि क्षणार्धात सलोनी खाली कोसळली. दुर्दैवाने खाली बैल बांधण्यासाठी असलेल्या लोखंडी रॉडवर आदळल्याने तिच्या पोटात हा लोखंडी रॉड घुसल्याने ती गंभीर जखमी झाली. परंतु दैव बलवत्तर व तिच्या आयुष्याचे दोर बळकट असल्याने ती आश्चर्यकारक पणे बचावली. तिला तातडीने प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालय व त्यानंतर सातारा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. यावेळी सलोनी घरच्यांशी बोलत सर्वांना आधार देत होती. शनिवार ता. १९ मे रोजी रात्री उशिरा सलोनीवर किचकट शस्त्रक्रिया करून तिच्या पोटात घुसलेला लोखंडी गज काढण्यात आला असून चिमुरडी आता सलोनी सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, वैद्यकीय खर्च पाहता भगत कुटुंबियांना आधार देण्यासाठी परळी भागासह जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. या शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर आणि रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनीही सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.
थेंबे..थेंबे तळे साचे....
भगत कुटुंबाला मदत करण्यासाठी ‘चंद्रकांत भगत, बॅक ऑफ महाराष्ट्र (परळी शाखा) च्या खाते नं. ६०२४१८६६००२ IFSC Code No. MAHB0000520’ वरती मदतीचे आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत निलेश चिकणे, राम चिकणे, विनायक चिकणे, किरण जांभळे, सर्जेराव चिकणे, महेश वांगडे, रविंद्र चिकणे, काशिनाथ वांगडे, अमोल वाईकर, विश्वास वांगडे, दिपक चिकणे, नितीन चिकणे, विक्रांत चिकणे, महेश वांगडे, अरुण वांगडे, गणेश वांगडे, प्रवीण चिकणे, चंद्रशेखर सकपाळ, विलास साळुंखे, भारत चिकणे, योगेश वांगडे, सागर चिकणे, विकास वांगडे, सचिन चिकणे, संतोष वांगडे, बाबूराव वांगडे, शशिकांत वाईकर आणि सुनील वाईकर यांनी मदत दिली आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |