02:11pm | Oct 13, 2019 |
सातारा : भाजप हा मॉब लिंचिंग, ट्रिपल तलाक बिल, 370 च्या आडून अत्याचार करत असून भारतात शरियत संपविण्याचा प्रयत्न करीत आहे अशा प्रकारचा समज भारतातील मुस्लिम समाजामध्ये आहे त्यामुळे मुस्लिम बांधव भाजप पासून दूर आहेत. भाजप हा विविध विषयांच्या माध्यमातून सतत देशभरातील मुस्लिम बांधवांच्यावर अन्याय, अत्याचार करत आहेत आणि ट्रिपल तलाक बिलमुळे तर संपूर्ण भारतातील जमियत उलेमा हिंद यांच्या पुढाकाराने लाखो महिलांनी रस्त्यावर उतरून भाजपचा निषेध ही व्यक्त केला आहे. नजीब, आखलाक, पहेलु खान आणि अलिकडेच झालेल्या तबरेज अन्सारीच्या मॉब लिंचिंग विरोधात हजारो मुस्लिम साताऱ्यात रस्त्यावर उतरले होते आणि ह्या घटनांचा आणि शासनाचा जाहीर निषेधही केला होता ह्या मोर्चात जमियत उलेमा हिंद ह्या संघटनेमार्फत सर्व स्तरातील बांधव रस्त्यावर उतरले होते. घर वापसी, अजाण बंदी, मस्जिदच्या बांधकामाला विरोध करून बांधकाम न करून देणे, जमातीला विरोध करने असले प्रकार भाजपच्या आडून भाजप समर्थकांकडून केले जात आहेत, असा समज साताऱ्यातील मुस्लिम बांधवांच्यात होता.
दोन्ही राजेंच्या भाजप प्रवेशाने सातारा भाजपमय झाला. परंतु नेहमीच राजघराण्याला 100 टक्के साथ देणारा मुस्लिम समाज काय भूमिका घेणार ह्याकडे दोन्ही राजे समर्थकांचे लक्ष लागून राहिले होते परंतु जसजसा प्रचार शिगेला पोहचू लागला आहे तशी निवडणुकीत रंगत येऊ लागली आहे. दोन्ही राजेंचा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी हजारो मुस्लिम बांधव सामील झाल्याने भाजपबद्दल इतरत्र असणारा मुस्लिम बांधवांतील समज साताऱ्यामध्ये राजेंच्या मुळे निष्प्रभ ठरला हे सिद्ध झाले .शिवेंद्रराजे आणि छ उदयनराजे यांनी वैयक्तिक भेटी वर भर देत असताना सर्व स्तरातून राजे हाच पक्ष असा विश्वास मुस्लिम बांधवांनी दिला. परंतु तळागाळातील मुस्लिम बांधवांच्यातील भाजपबद्दलचा अपप्रचार दूर व्हावा ह्यासाठी भाजपचे विठठल बलशेटवार, थोरात यांच्या उपस्थितीत व मुस्लिम समाजाचे प्रमुख इब्राहिम (बाबाशेठ) तांबोळी ह्यांच्या अध्यक्षतेखाली midc येथील त्यांच्या कार्यालयात दोन्ही राजेंच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली .
भाजप विरोधात आंदोलन करण्यामध्ये जमियत ही संघटना अग्रेसर आहे आणि ह्या जमियत संघटनेवर इब्राहिम तांबोळी यांचा मोठा प्रभाव आहे त्यामुळे भाजप विरोधी वातावरण साताऱ्यात तयार होऊ नये तसेच सर्व क्षेत्रातील बांधव एकत्र जोडून दोन्ही राजेंच्या कार्याचा आणि विकासाचा मानस त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी मुस्लिम बांधवांचा मेळावा घेण्याचे ह्या बैठकीत ठरले आहे.
साताऱ्यातील सर्व प्रतिष्ठित मुस्लिम बांधव ह्या बैठकीत हजर होते. प्रत्येकाने राजेंच्या धर्मनिरपेक्ष कामाचा पाढा वाचत राजेंना ऐतिहासिक मतांनी निवडून आणण्याचे आवाहन केले. आज संपन्न झालेल्या ह्या बैठकीमुळे साताऱ्यातील मुस्लिम बांधव क्रांतिकारी भूमिकेत आला असून इब्राहिमबाबाशेठ तांबोळी यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण देशात उच्चंकी मतदान करून भाजपच्या उमेदवाराला निवडून देईल आणि मुस्लिम बांधवांच्याबद्दल पसरवत असलेला गैरसमज दूर करेल, असे आवाहन सर्व प्रमुख मंडळींनी केले .
ह्याप्रसंगी फिरोज पठाण, नासिरशेठ बागवान, अमीन कच्छी, मुक्तार पालकर, शकील बागवान, रियाज तडसरकर, जुबेर कच्छी, अन्सार आतार, रफिक फरास, इकरमा बारस्कर, शोएब सय्यद, तबरेज शेख, मुन्ना बागवान, नाशिर शेख व मुस्लिम समाजाचे जबाबदार मंडळी उपस्थित होती.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |