RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

बीएस येडियुरप्पा यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, 31 जुलैला बहुमत सिद्ध करणार

27 July 2019 at 01:32

बेंगळूरू : भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांनी आज(शुक्रवार) कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याआधी ते राज्यपाल वजुभाई वाला यांना भेटण्यासाठी राजभवनात गेले होते. त्यांनी कर्नाटकात सरकार स्थापनेचा दावा केला आहे. 31 जुलैला ते विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. 23 जुलैला कुमारस्वामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले होते. बहुमत सिद्ध न करू शकल्याने काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार फक्त 14 महिन्यात कोसळले. त्यानंतर आता येडियुरप्पा चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

सरकार बनवण्याच्या रणनितीवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी कर्नाटकच्या भाजप नेत्यांचे एक मंडळ गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले होते. यात भाजप नेते जगदीश शेट्टार आणि अरविंद लिम्बावलीसहित जेष्ठ नेते होते.

कर्नाटक विधानसभेची सदस्यसंख्या २२५ आहे. त्यातील एक अपक्ष आणि काँग्रेसच्या दोन बंडखोर सदस्यांना विधानसभा सभापती के. आर. रमेश कुमार यांनी अपात्र ठरवलं आहे. त्यामुळे एकूण सदस्यसंख्या २२२ झाली आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या आणखी १४ बंडखोर सदस्यांबाबत अद्याप सभापतींनी निर्णय घेतलेला नाही. सद्यस्थितीत सभागृहात ११२ हा बहुमताचा आकडा आहे. बंडखोर आमदार सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याची शक्यता धुसर आहे. त्यांच्या अनुपस्थितीत २०८ इतके सदस्य उरतील आणि बहुमताचा आकडा १०५ वर येईल. हे गणित भाजपच्या पथ्यावर पडणारं आहे. भाजपकडे १०५ इतकं संख्याबळ असून दोन अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. ते पाहता येडियुरप्पा तूर्त बहुमताची परीक्षा पास होतील, हे जवळपास निश्चित आहे.

 

माजी केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ भाजप नेते अरुण जेटली यांचे निधन

माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचे आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश

yesterday

अखेर चिदंबरम अटकेत

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर बुधवारी दिवसभराच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर रात्री दहा वाजता सीबीआयने अटक केली. अटक टाळण्यासाठी चिदंबरम यांनी दिवसभर प्रयत्न केले.

22 August 2019 at 14:18