सातारा : फसवणूकप्रकरणी योगेश कांतीलाल शहा (मूळ रा.विकासनगर, सातारा सध्या रा.धायरी, हवेली, पुणे) याला पुणे ग्रामीण पोलिसांनी सातारा येथे अटक केली असून त्याच्यावर सुमारे २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणीचा गुन्हे दाखल आहेत. सासवड व नारायणगाव पोलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल असून तो सिमेंट विक्रीचा उद्योजक असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, सातारा शहर पोलिसांनी संशयिताला पकडून देण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, संशयित योगेश शहा याच्याविरुध्द सासवड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून तो पोलिसांना सापडत नव्हता. संशयित हा सिमेंटचा एजंट असल्याचे सांगून व्यवसाय करत आहे. याच व्यवसायातून सिमेंट डिलरकडून घ्यायचे ते दुसर्यांना विकत होता. अशाप्रकारे व्यवहार करताना त्याने अनेकांना रकमा दिल्या नसल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली.
सासवड पोलिस संशयित योगेश शहा याला शोधत होते मात्र तो सापडत नव्हता. सासवड पोलिस अधिक तपास करत असताना त्याच्याविरुध्द नारायणगाव पोलिस ठाण्यातही १ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. दरम्यान, सातारा येथे संशयिताचे जाणे-येणे असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी पोनि नारायण सारंगकर यांच्याशी संपर्क साधला. सातारच्या पोलिसांनी संशयितावर वॉच ठेवल्यानंतर तो अलगद सापडला.
संशयित योगेश शहा पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, शहा याच्यावर मंचर, खेड, चाकण, सिंहगड या पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल असून त्याठिकाणी पोलिसांनी त्याला यापूर्वीच अटक केेलेली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |