03:16pm | Apr 20, 2018 |
सातारा : पाडव्याच्या बाजारासाठी प्रसिध्द असलेल्या आनेवाडी ता. जावली येथील राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली ठेक्यामुळे कोजागिरी पार्णिमेला झालेल्या राड्यामुळे राष्ट्रवादीचे खासदार, आमदार समर्थकांना जेलची हवा खावी लागली. काहींना मोक्का लागला आहे. असे असताना ज्यांच्या जमिनी या सहा पदरीकरणासाठी गेल्या आहेत. अशा स्थानिकांची वाहने अडविण्याचा प्रकार पुन्हा सुरू झालेला आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी उघडपणे संबधीत ठेकेदाराविरोधात ‘अस्त्र’ उगारले आहे. तर वाहन चालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून खासदार समर्थक ठेकेदार विरूध्द वाहन चालक असा संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान संबधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांची भुमिका गुलदस्त्यात आहे.
पुर्वी आनेवाडी टोल नाक्यावर मानवता भावनेतून स्थानिकांना टोल वसुलीसाठी रोजगार मिळत होता. तसेच त्यांच्या खाजगी प्रवाशी वाहनांना सुध्दा सवलत मिळत होती. अनेक राजकीय पक्ष व संघटनेच्या पदाधिकार्यांच्या वाहनांना अनाधिकृतपणे टोल वसुलीबाबत सवलत मिळत आहे. त्यामुळे ठेकेदार आणि स्थानिकांमध्ये समन्वय निर्माण झाला होता. कोणताही वाद विवाद नव्हता. परंतु खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांनी टोल वसुलीचा ठेका मिळावा यासाठी शक्ती पणाला लावली. त्यातून स्थानिक भूमिपुत्रांऐवजी ज्यांचा काही संबध नाही, अशा व्यक्तींच्या राड्यामुळे आनेवाडी परीसरातील स्थानिकांना पोलीसांनी चौकशीकामी वेठीस धरले होते. या राड्याच्या माध्यमातून राजकीय गट निर्माण झाले. त्यातून प्रवाशी वाहतुक करणार्या वाहनचालकांना त्याचा फटका बसू लागला आहे.
गेले अनेक दिवस आनेवाडी टोल नाक्यावर स्थानिकांना व प्रवाशी वाहतुक करणार्या वाहनांना टोल माफी दिल जात होती. यामध्ये जमिनी विकून काही सुशिक्षीत बेरोजगारांनी प्रवाशी वाहतुक करण्यासाठी चार चाकी वाहने घेतली होती. आता अशा वाहनांवर टोल आकारणी होवू लागल्यामुळे संघषर्र् पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सदर वाहन चालक यांना राजकारणापेक्षा स्वत:च्या उदरनिर्वाहाची काळजी आहे. त्यांना संघर्ष नको तर समन्वयाने प्रश्न सुटावा यासाठी त्यांनी आत्तापर्यंत मौन धारण केले होते. आता स्थानिकांचा पाठींबा मिळत असल्याने या टोल नाक्यावर संषर्घाचा भडका उडाल्यास आश्यर्य वाटणार नाही अशी परिस्थिती आहे.
सध्या खासदार समर्थकाने टोल वसुलीचे काम घेतल्यामुळे वाहनचालकांना अन्याय सहन करावा लागत आहे. दाद कुणाकडे मागावी? असा तेढ निर्माण झाला आहे. कोणताही वाद नको म्हणून 15 ते 20 दिवस या मार्गावरील प्रवाशी जीप चालकांनी वाहने बंद ठेवली होती. त्यामुळे सातारा-पाचवड, सातारा-भुईंज, सातारा-वाई या मार्गावर प्रवाशी वाहतुक करताना एसटी महामंडळावर ताण पडला होता. सध्या भाजप-सेनेचे सरकार असले तरी या प्रश्नाबाबत थेट खा. उदयनराजे भोसले यांचे समर्थक असल्यामुळे या विरोधात कोणीही बोलत नाही. परंतु जनमानसात त्याचे पडसाद उमटत असून खासदारांची असणारी लोकप्रियतेला बाधा येत आहे. भु-मात दिंडीच्या माध्यमातून शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. याला 9 वर्षाचा कालावधी लोटला पण प्रश्न सोडविण्याऐवजी खासदार हे मतदार संघाच्या बाहेरील ठेकेदाराचे हित पहात असल्याचे उघड झाले आहे. तशा पध्दतीने जावली, वाई, सातारा तालुक्यात चर्चा सुध्दा आहे. हा फक्त प्रवाशी वाहतुक चालकांच्या प्रश्नाशी सिमेट नाही तर अनेक विकास कामात नेमलेल्या ठेकेदारीबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. या विरोधात आता स्थानिक भुमिपूत्र एकवटले असून कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी आता मतदार संघाच्या बाहेरील टोल नाक्याच्या ठेकेदाराच्या विरोधात स्थांनिकांनी ’एल्गार’ पुकारला आहे. महामार्गाच्या धिम्या गतीच्या कामामुळे 189 जणांना प्राण गमवावे लागले असताना त्याबाबत या ठेकेदारांवर पोलीसांनी गुन्हा दाखल करावा. यासाठी न्यायालयात लकरच धाव घेतली जाईल असे स्थानिकांनी माहिती दिली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |