सातारा : स्वातंत्र्यासाठी तळहात शिरावर घेवून लढण्यासाठी सज्ज झालेल्या सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील ज्येष्ठ सैनिक बाबूमियाँ फरास यांच्या 98 व्या वाढदिनी त्यांच्या शाहू कृपा या निवासस्थानी त्यांचे नगराध्यक्षासह शहरातील मान्यवरांनी अभीष्टचिंतन केले.
ऐन उमेदीच्या वयात देशप्रेमाने प्रेरीत झालेले बाबूमियाँ यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आझाद हिंद सेनेत प्रवेश केला. त्यानंतर आझाद हिंद सेना बरखास्त होईतोपर्यंत अत्यंत प्रामाणिक राहून कार्य करणार्या बाबूमियाँ यांना थेट सुभाषबाबूंसमवेत काम करण्याचे भाग्य लाभले. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते बाबूमियाँ फरास यांना ताम्रपट प्रदान करण्यात आला होता. तदनंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बाबूमियाँच्या कार्याचा यथोचित गौरव केला होता. बाबूमियाँ यांचे सातार्याच्या राजघराण्याशीही अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मंगळवार दि. 15 मे रोजी बाबूमियाँ यांनी वयाच्या 98 व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने त्यांना सातार्याच्या नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी घरी जावून बुके देवून त्यांच्या दिर्घायुष्यासाठी अभीष्टचिंतन केले. दरम्यान, नगरसेवक अमोल मोहिते, प्रशांत आहेरराव, कॉ. किरण माने, दक्ष विचार मंचचे ओमकार तपासे, रवी पाटेकर, गुरुदास अडागळे, पाटणच्या पंचायत समिती सदस्या सौ. सय्यद यांनीही बाबूमियाँ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, छत्रपती शिवाजीराजे भोसले, चंद्रलेखाराजे भोसले, जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि मान्यवरांनी दूरध्वनीवरुन बाबूमियाँ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
त्या पिढीतील बहुधा एकमेव...
बाबूमियाँ फरास हे आझाद हिंद सेनेतील सातारा जिल्ह्यातीलच नव्हेतर देशातील बहुधा एकमेव सैनिक असावेत. त्यांच्यासोबत आझाद हिंंद सेनेत असलेले सातारा जिल्ह्यातील बहुतांशी समकालीन सहकारी आज हयात नाहीत. आझाद हिंद सेनेत कार्यरत असलेल्यापैकी त्या पिढीतील बाबूमियाँ हे बहुधा एकमेव सदस्य असावेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |