सातारा : ऐतिहासिक महादरे तलाव स्वच्छता मोहीम सातारा नगर परिषदेच्यावतीने पंधरा दिवसांपूर्वी सुरु करण्यात आली होती, ती अंतिम टप्प्यात असून मोकळा तलाव आणि तलावाची मूळ बांधणी पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. सुमारे दिडशे वर्षांपूर्वी बांधलेल्या महादरे तलावाची पहिल्यांदाच स्वच्छता करण्यात येत असून जलसंपदा आणि पालिकेसह खाजगी यंत्रणेचा वापर तळे स्वच्छतेसाठी करण्यात येत असल्याची माहिती नगरसेवक अण्णा लेवे यांनी दिली.
साताऱ्याच्या स्थापनेनंतर १८७० साली छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या काळात महादरे तलाव बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. याचदरम्यान कास तलावाची निर्मिती करण्यात आल्याचा नोंदी आहेत. महादरे तलाव ७५ मी. रुंद आणि ७० मी. लांब असून ९ मी. खोल आहे. तलावाची पाणी साठवण क्षमता ४७ कोटी लिटर असून आता स्वच्छतेमुळे त्यात ५५ लक्ष पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. आतापर्यंत २५०० डंपर गाळ काढण्यात आला आहे. घडीव दगडांमधून तळ्याची बांधणी करण्यात आली असून साठणाऱ्या पाण्याचे वितरण करण्यासाठी चोख व्यवस्था त्यावेळी करण्यात आल्याचे पहायला मिळते. तळ्यात उतरण्यासाठी मुख्य मार्गासह बाजूने दोन भुयारे आहेत. यासह तळ्यातील डब्या पाण्याचा ओव्हर-फ्लो झाल्यास बांधण्यात आल्या होत्या. हे तळे आणि अंतर्गत बांधकाम सुस्थितीत असून त्याकाळातील बांधकामांचा उत्कृष्ट नमुना आहे. तळ्यापासून पूर्व भागाची तहान महादरे तलावामुळे पूर्ण झाली. खापरी पाईपलाईनमधून डब्यांच्या सहाय्याने शहरात पाण्याचे वितरण केले जात. जुन्या राजवाड्यात याच पाण्याचे कारंजे पूर्वी उडत होते, तेही पाण्याच्या नैसर्गिक उतारामुळे आणि कोणत्याही खर्चाविना हे विशेष आहे.
गेल्या दीडशे वर्षात या तळ्याची स्वच्छता झाली नसली तरी अल्पावधीत २ पोकलॅन, २ जेसीबी, ३ डोझर, १ क्रेन आणि ४ डंपरच्या माध्यमातून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे तळ्यातील पाणी साठवण क्षमतेत सुमारे ५५ लक्ष लिटरची वाढ होणार असल्याची माहिती नगरसेविका सुनिता पवार यांनी दिली. तळ्याच्या स्वच्छतेचे काम पूर्ण झाल्यानंतर तळ्याला संरक्षक भिंत बांधून हा पर्यटन पॉईंट म्हणून विकसित करावा, अशी मागणी रवि पाटेकर आणि स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
केवळ ११ लाखात स्वच्छता....
यापूर्वी मंगळवार तळे स्वच्छ करताना सुमारे २३ लक्ष खर्च आला होता, त्यामुळे तळी स्वच्छतेवर टीका झाली होती. मात्र, मंगळवार तळ्याच्या चौप्पट असलेल्या महादरे तलावाची स्वच्छता अवघ्या १२ लाखात झाल्यामुळे नगराध्यक्षा माधवी कदम यांनी समाधान व्यक्त केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |