कराड : मागील आठवड्यात कराड शहरातील सूर्यवंशी मळा परिसरात ड्रेनेज लाईनचे काम सुरु असताना काढलेल्या खड्ड्यात पडून कराडमधील मंगळवार पेठेतील विजय शिंदे यांना अपघात झाला होता. यात ते जागीच ठार झाले होते. त्यानंतर मंगळवारी (ता.19) सकाळी विजय शिंदे यांच्या नातेवाईकांसह सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि कराडकर नागरिकांनी कराड नगरपालिका कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
दरम्यान, ठेकेदाराशी चर्चा करून कराड नगरपालिका शिंदे कुटुंबियांना न्याय देईल, अशी ग्वाही मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली. त्यामुळे सुमारे अडीच तासांनी उपोषण स्थगित करण्यात आले. सकाळी 11 वाजता लाक्षणिक उपोषणाला प्रारंभ झाल्यानंतर विनायक पावसकर, सुहास जगताप, फारूख पटवेकर, विद्या पावसकर, राजेंद्र माने यांच्यासह काही नगरसेवकांनी उपोषणस्थळी आंदोलकांची भेट घेतली. शिंदे कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, ठेकेदारासह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी हे उपोषण करण्यात आले होते.
दुपारी दीडच्या सुमारास मुख्याधिकारी यशवंत डांगे, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, ए. आर. पवार यांनी सुदर्शन पाटसकर, प्रमोद पाटील, जावेद नायकवडी तसेच अन्य आंदोलकांसह शिंदे यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. यावेळी आठ दिवसात आर्थिक मदतीबाबत निर्णय घेऊ अशी ग्वाही देण्यात आल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |

'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |