RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराज शिंदे

14 September 2018 at 19:04

सातारा : सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक मते घेऊन आलेले वाई तालुक्यातील युवा नेते विराज शिंदे यांची निवड झाली. सातारा जिल्हा काँग्रेसचे नेते कधी नव्हे ते जिल्हा युवक काँग्रेस निवडीच्या निमित्ताने एकत्र झाले. जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील आणि आ. जयकुमार गोरे यांच्यातील अंतर्गत वादही या निवडीतून थांबला असल्याचे स्पष्ट झाले. माजी आमदार मदन भोसले यांनीही या निवडीत काँग्रेसबरोबर असल्याचे दाखवून दिले.

सातारा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदाची निवड राष्ट्रीय कार्यकारिणीने आखून दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे होणार असल्याने मतदार नोंदणी बुथनिहाय झाली होती. ज्याला सर्वाधिक मते तो अध्यक्ष, दुसर्‍या क्रमांकाची मते घेणारा उपाध्यक्ष, त्याच्या खालोखाल मते घेणारा सरचिटणीस, खजिनदार अशी ही रचना होती. बुथनिहाय निवडी सुरू असताना अध्यक्षपदाचे दावेदार अनेकजण होते. मात्र, मतदारनोंदणी सर्वाधिक कोण करेल तोच अध्यक्ष होणार हे निश्‍चित होते. असे जरी असलेतरी औपचारिकता म्हणूनच मतदान घेण्यात आले. विराज शिंदेच अध्यक्ष राहतील, असे सुरुवातीलाच ठरवण्यात आले होते.

सातारा जिल्हा युवक काँग्रेसची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी, जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील यांचे सुरुवातीपासूनच प्रयत्न होते. तत्कालीन अध्यक्ष राहुल घाडगे आणि उपाध्यक्ष दयानंद भोसले यांनी युवक काँग्रेसमध्ये पद भूषवले असल्यामुळे त्यांची जबाबदारी या दोघांवर देण्यात आली होती. त्यानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण असेल यावर चर्चा झाली आणि विराज शिंदे या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र, या निवडीसाठी मदन भोसले यांचेही मत घेणे विचारात होते आणि आ. जयकुमार गोरे यांची मनधरणी करणे अपेक्षित होते. कारण आ. पाटील आणि त्यांच्यातील अंतर्गत लढाई सुरूच होती. त्यामुळे उमेदवारी मान्य होते की नाही, असाही प्रश्‍न होता. त्यानुसार आ. पाटील व मदनदादा भोसले आणि मदनदादा व आ. गोरे यांच्या बैठका झाल्या. या बैठकीत विराज शिंदे यांच्या नावावर एकमत झाले. या निवडणूक प्रक्रियेत अ‍ॅड. विजयराव कणसे, हिंदुराव पाटील, रणजितसिंह नाईक- निंबाळकर, धैर्यशील कदम, जयकुमार शिंदे, दयानंद भोसले, शिवराज मोरे यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले असल्याचे काँग्रेसमधील एका नेत्याने निवडीनंतर सांगितले. 

विराज शिंदे व निलेश चव्हाण हे युवक जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात होते. युथच्या झालेल्या निवडणुकीत विराज शिंदे यांना 2556 मते विजयी झाले तर प्रतिस्पर्धी निलेश चव्हाण यांना 1719 मते मिळाली. कराड दक्षिण विधानसभा  अध्यक्षपदी वैभव थोरात, उपाध्यक्षपदी समीर पटवेकर. कराड उत्तर विधानसभा अध्यक्षपदी अमित जाधव, उपाध्यक्षपदी अजित पवार. पाटण विधानसभा अध्यक्षपदी गिरीष पाटील, उपाध्यक्षपदी जगदीश पाटील. कोरेगाव विधानसभा अध्यक्षपदी अजित भोसले, उपाध्यक्षपदी केदार केंजळे. सातारा जावली विधानसभा अध्यक्षपदी विक्रांत चव्हाण, उपाध्यक्षपदी सादीक खान. फलटण विधानसभा अध्यक्षपदी चंद्रसेन कदम, उपाध्यक्षपदी धनंजय पवार. माण विधानसभा अध्यक्षपदी दादासाहेब काळे, उपाध्यक्षपदी अजित खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात प्रभारी राकेश नेगी यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.

 

सात लाखाच्या चहा पावडरची चोरी

सातारा एमआयडीसीतील गोडावूनमधून तब्बल ७ लाख रुपयांची चहाची पावडर चोरी झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

7 hours before

कराड बसस्थानकात एस.टी.च्या धडकेत सातारची वृद्धा ठार

कराड बसस्थानकामध्ये एस.टी. पाठीमागे घेत असताना एस.टी.ची धडक बसून सातारा येथील वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.

10 hours before

कोयना विभागात भूकंपाचे दोन धक्के

कोयना धरण परिसरात सोमवारी सकाळी 3.1 रिश्टर स्केलचे दोन भूकंपाचे धक्के जाणवले.

yesterday

अपघातात उंब्रजचे दोन युवक ठार

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने पाठीमागून धडक दिली.

yesterday