09:06pm | May 29, 2018 |
सातारा : तोडा, फोडा आणि राज्य करा या नीतीने देशभरातील बहुजन मूलनिवासी हे हजारो जातींच्या तुकडय़ात वाटले गेले आहेत. तुकडय़ा तुकडय़ाने असलेल्या या जातींना एकत्रित करुन त्यांच्या न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा ही कल्पना साकारत आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील 36 जिल्हे, 367 तालुके व 44 हजार गावात परिवर्तन यात्रा सुरु आहे. विकासापासून वंचित राहिलेल्याहजारो जातींना तुकडय़ात वाटून त्यांच्यावर अन्याय सुरु आहे. तो दूर करण्यासाठी ही परिवर्तन यात्रा आता देशभरातील 31 राज्यात 550 जिल्हय़ात व 1 लाख 50 हजार गावांमध्ये जाणार आहे असून अशी ही पहिलीच परिवर्तन यात्रा असल्याचे प्रतिपादन बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामनमेश्राम यांनी केले.
बहुजन क्रांती मोर्चातर्फे सुरु असलेल्या परिवर्तन यात्रेचे आगमन सातारा शहरात झाल्यानंतर गांधी मैदानावर झालेल्या जाहीर सभेला मार्गदर्शन करताना मेश्राम बोलत होते. व्यासपीठावर सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष भालचंद्र माळी, क्रांती थिएटरचे अध्यक्ष अमर गायकवाड, चर्मकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश रावखंडे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांबळे, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या संध्या शिर्के, घिसाडी समाजाचे नेते मुरलीधर पवार, आरपीआय ब्ल्यू फोर्सचे दादासाहेब ओव्हाळ, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे आयुब मुल्ला, अमोल बनसोडे उपस्थित होते. वामन मेश्राम पुढे म्हणाले, भीमा कोरेगाव येथे झालेली दंगल ही शासन पुरस्कृत दंगल होती. मुख्यमंत्र्यांचे वर्तन संशयास्पद असेच होते कारण चौकशी होण्याच्या आता दंगलीचा कट करणाऱया मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना त्यांनी क्लीनचिट दिले.
त्यांनी चौकशीचा अहवाल येईपर्यंत वाट पाहणे आवश्यक होते. मात्र, त्यांची दंगलीला चिथावणी देणारऱयांना वाचवण्याची भूमिका जगजाहीर झालेली आहे. न्यायालयात आता पुरावे सादर करण्याचे काम सुरु असून जनतेतून खाजगी चौकशी सुरु आहे. सगळे ठोस पुरावे न्यायालयात सादर केल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्याविरोधात कायद्याच्या विरोधी आचरण केल्याप्रकरणी केसेस दाखल करणार आहोत.प्रस्थापितांकडून सुरु असलेल्या अन्याय, अत्याचारात देशभरातील हजारो जातींच्या तुकडय़ात वाटलेली जनता भरडून निघत आहे. हे हजारो जातीच्या तुकडयातील बांधव म्हणजे बहुजन व मूलनिवासी आहेत. त्यांच्यात परिवर्तन घडवून आणून संविधानिक मार्गाने संघर्ष करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा ही संकल्पना पुढे आली आहे. 6 हजार जातीतील लोकांना जागृत करुन, त्यांना संघटीत करुन त्यातून निर्माण होणाऱया शक्तीतून विवेकवादी वृत्तीने सर्वांना न्याय देण्याची व्यवस्था निर्माण केली जाईल. त्यासाठी एस. सी. एन. टी. ओबीसी, भटके विमुक्तातील हजारो जातीत वाटले गेलेल्या लोकांनी बहुजन क्रांती मोर्चाच्या छत्राखाली एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी बहुजन क्रांती मोर्चाला सातारा जिल्हय़ातर्फे एक लाख रुपयांचा निधी वामन मेश्राम यांच्याकडे प्रदान करण्यात आला. यावेळी महिला आघाडीकडून अडीच हजार रुपयांचा निधीही देण्यात आला. जिल्हय़ातील विविध जातीच्या 250 संघटनांचा जाहीर पाठिंबाही व्यक्त करण्यात आला. सभेस विविध जातीधर्मातील नागरिक, महिला, युवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |