तृणधान्य म्हणजे काय?
प्रत्येक धान्याचे प्राथमिक रूप हे तृणधान्यच असते. शेतामध्ये पिकाची वाढ होत असताना त्यात निर्माण झालेले बियाणे म्हणजेच तृणधान्य होय. उदाहरणार्थ, मका, तांदूळ, गहू, ज्वारी, नाचणी इत्यादी. तृणधान्यांमध्ये तीन प्रकारच्या घटकांचा समावेश असतो. एक म्हणजे बाहेरचे टरफल किंवा कोंडा. दुसरे म्हणजे अंकुर आणि शेवटचे ते एन्डोस्पर्म म्हणजेच धान्याचा गाभा. या तीन प्रकारच्या आवरणांमुळे सूर्यप्रकाश, पाणी, रासायनिक खते आणि विविध रोगांपासून तृणधान्याचे संरक्षण होते.
ऊर्जेचा स्रोत
तृणधान्ये हा ऊर्जा देणारा सर्वोत्तम स्रोत आहे. बहुतांश देशांमध्ये याचा मुख्य आहारामध्ये समावेश आहे. सध्या ओट्सना विशेष मागणी आहे. ओट्सच्या माध्यमातून अन्य तृणधान्यांइतकीच पोषणतत्त्वे शरीराला प्राप्त होतात. राहत्या भागामध्ये सहजरीत्या उगवत असलेली आणि उपलब्ध असलेली तृणधान्ये आहारात घेण्याकडे अधिक प्राधान्य द्यावे. उदाहरणार्थ, उत्तरेकडील राज्यांमध्ये गहू, आंध्र प्रदेशमध्ये मका, पूर्वेकडील राज्यांमध्ये तांदूळ, महाराष्ट्रात ज्वारी आणि बाजरी, कर्नाटकामध्ये नाचणी किंवा रागी आणि काश्मीरमध्ये ओट्स.
शरीराला फायदे
तृणधान्यांमध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड मोठय़ा आतडय़ातील चांगल्या जिवाणूंच्या वाढीस मदत करते. या जिवाणूंमुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते, पोषणाचे शोषण अधिक चांगल्या रीतीने होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तृणधान्याच्या नियमित सेवनाने लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो आणि आयुर्मान वाढते. नाचणी किंवा रागी हे अशक्त असलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी आहारामध्ये तृणधान्यांचा समावेश असणे गरजेचे आहे.
कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी
तृणधान्यांमुळे हृदयविकारासाठी कारणीभूत ठरणारे हलके कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराड्स या दोघांचेही शरीरामध्ये शोषण टाळता येते, तसेच रक्तदाबही नियंत्रणात राहतो. दिवसभरात आहारामध्ये दोन ते तीन वेळा तृणधान्यांचे सेवन करणाऱ्या महिलांना हृदयविकार होण्याची शक्यता सुमारे ३० टक्क्य़ांनी कमी असते. तृणधान्यांमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, बार्ली, ब्राऊन राइस, राय हे आवर्जून खावेत.
वजनावर नियंत्रण
तृणधान्यांमुळे भूक नियंत्रित ठेवली जाते. तृणधान्ये आहारात घेतल्याने पोट बराच काळ भरलेले असल्याने वारंवार खाण्याची गरज भासत नाही. तृणधान्यांचे सेवन करणाऱ्यांना वजन नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत; परंतु याचा अर्थ असा नव्हे, की याच्या सेवनाने वजन कमीच होत राहते. तृणधान्ये खाल्ल्याने विशेषत: शरीराच्या मध्यभागात लठ्ठपणा येत नाही. यामुळे शरीरामध्ये चरबीचे समप्रमाणात संतुलन राहते.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |