RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

शेंदूरजने येथील धोम डाव्या कालव्यात युवकाचा मृतदेह

08 June 2019 at 04:59

चार दिवसात सातवा मृतदेह सापडल्याने वाई तालुक्यात खळबळ

वाई :  शेंदूरजने गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यात एका युवकाचा मृतदेह मिळून आला असून अद्याप मृत्यू चे कारण समजू शकले नाही. गेली चार दिवसात कालव्यात सापडलेल्या मृतदेहांची संख्या आता चार झाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शेंदूरजने येथील हॉटेल रुचिराच्या पाठीमागे धोम डाव्या कालव्यात शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अंदाजे २५ ते ३० वयोगटातील पुरुष जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती शहाबाग ग्रामपंचायतीचे शिपाई जुबरे यांनी फोन वरून अनिल जमदाडे यांना दिल्यानंतर जमदाडे यांनी घटनेची शहनिशा करून याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. गोरख तुकाराम दुबळे ( वय ३०) रा. फुलेनगर असे त्या युवकाचे नाव असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून तो वाई एमआयडीसी मध्ये कामाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे. 

दरम्यान गेली चार दिवसात धोम कालव्यात पाण्यात बुडून व पडून मृत्यू पावलेल्यांची संख्या चार वर पोहचली आहे. तर एका महिलेचा मृतदेह धरण पात्रात सापडला असून दोघांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे घटनाही गेली चार दिवसात घडल्या आहेत. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा सात झाला आहे.

 

जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.

5 hours before

एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

कराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 hours before

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.

5 hours before

सातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

5 hours before