कराड : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज (मंगळवारी) केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी मूक आंदोलन करण्यात आले. येथील कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास अभिवादन करून कराड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सुमारे दोन तास मौन ठिय्या आंदोलन करत केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांचा सत्याग्रह पद्धतीने निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्वे आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अविनाश मोहिते, सातारा जिल्हा अध्यक्ष सुनील माने, कराड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, आनंदराव पाटील, कराड जनता बँकेचे चेअरमन राजेश पाटील, सह्याद्रि कारखान्याचे संचालक संजय जगदाळे, डी. बी. जाधव, अॅड. मानसिंगराव पाटील, कराड पंचायत समितीचे उपसभापती सुहास बोराटे, माजी जि.प.सदस्य राजाभाऊ पाटील-उंडाळकर, पांडुरंग चव्हाण, सौ.विनीता पलंगे, सुरेखा जाधव, नंदकुमार बटाणे, पोपटराव साळुंखे, सौ.प्रभावती माळी, सौ.मिना बोरगांवे, अॅड.दिपीका घाडगे, सौ.शालन माळी, रमेश चव्हाण, सौ.सुषमा नागे, सौ.वनिता माने, प्रणव ताटे , कांतीलाल जगदाळे, नगरसेवक वैभव हिंगमिरे, सुहास पवार, शिवाजी पवार, अख्तर आंबेकरी, अमित शिंदे, शशिकांत पोळ, गंगाधर जाधव, नाना खामकर, डॉ.विजय साळुंखे, बाळासाहेब सुर्यवंशी, गोपाळराव धोकटे, मारूती बुधे, वसंतराव पाटील-कोरेगांवकर, आनंदराव पाटील, शंकरराव खापे, अॅड. चंद्रकांत कदम, अॅड.प्रताप पाटील आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या हातात केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांकडे निर्देश दाखवणारे पालक घेतले होते. कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता केवळ फलकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी आपल्या आंदोलनाचा उद्देश साध्य केला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |