RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

सातार्‍यात आणि माढ्यात भूमिपुत्रांचाच डंका ?

23 May 2019 at 03:26

श्री. छ. उदयनराजे भोसले आणि रणजितसिंहांच्या निवडीकडे जिल्हावासियांचे लक्ष

सातारा : सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे श्री. छ. उदयनराजे भोसले हॅट्रीक करणार? की, माढा लोकसभा मतदारसंघातून फलटणचे भूमिपुत्र रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपचे कमळ फुलवणार? याकडे सातारा जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मात्र यासाठी उद्या रात्री उशिरापर्यंत याची वाट पहावी लागणार आहे.

सातारा आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघांकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रासह देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज श्री. छ. उदयनराजे भोसले तब्बल तिसर्‍यांदा सातारा लोकसभा मतदारसंघातून हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. परंतू युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनीही त्यांना निवडणुकीत कडवी लढत दिली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून शेवटपर्यंत भाजप व शिवसेना युतीला तुल्यबळ असणारा उमेदवार मिळत नव्हता. सातारा लोकसभेसाठी अनेकजण इच्छुक होते. शेवटी राष्ट्रवादीतून कोलांटउडी घेवून भाजपात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना शिवसेनेने शिवबंधन बांधून उमेदवारी दिली. कराड दक्षिण व पाटण तालुक्याच्या जोरावर नरेंद्र पाटील यांनीही जोरदार मुसंडी मारत सातारा जिल्ह्यात प्रचारयंत्रणा राबवली. मात्र, वाढलेले नवीन मतदान विद्यमान खासदार उदयनराजे यांच्या पथ्यावर पडणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. उदयनराजेंनी युतीची उमेदवारी घ्यावी, अशी इच्छा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती. यासाठी खास शिवप्रतिष्ठानचे संस्थापक भिडे गुरुजी यांनीही खास फिल्डिंग लावली. मात्र राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांच्या शिष्टाईमुळे यांच्यामुळेच उदयनराजेंनी राष्ट्रवादीतून सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. गेल्या निवडणुकीत खा. उदयनराजे सुमारे पावणे चार लाखांच्या मताधिक्याने निवडून आले होते. मात्र विकासाचे मुद्द्यावर विरोधकांनी खा. उदयनराजेंना खिंडीत गाठले. विरोधकांच्या प्रभावी प्रचारयंत्रणेमुळे या निवडणुकीत उदयनराजेंना प्रचंड संघर्ष करावा लागला. मात्र शिवछत्रपतींचे वंशज आणि सातारा लोकसभेत वाढलेले नवीन मतदान हे उदयनराजेंसाठी जेमेचे बाजू असणार आहेत. शेवटी याचा फैसला मात्र उद्याच होणार आहे.

माढा लोकसभेची निवडणूक यावेळी ‘हाय व्होल्टेज’ झाली. 2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेत माढा हा नवीन मतदारसंघ जन्मास आला. पक्षांतर्गत बंडाळ्या टाळण्यासाठी आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी आपला पारंपारिक मतदारसंघ बारामती सोडून माढ्यातून लढण्याचा निर्णय घेतला. माढा मतदारसंघात असलेल्या राष्ट्रवादीच्या प्राबल्यामुळे 2009 सालच्या निवडणुकीत भाजपच्या सुभाष देशमुख यांना चारीमुंड्या चित करत खा. शरद पवार माढा मतदारसंघातून सहजपणे निवडून आले. परंतू 2014 च्या निवडणुकीत खा. पवार यांनी लोकसभा निवडणूक न लढवता राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला. परिणामी या जागेवरुन माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी देण्यात आली. मात्र, ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी सोपी नव्हती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उभे असलेल्या सदाभाऊ खोत यांनी कडवी झुंज दिली. शेवटी सदाभाऊ खोत यांचा निसटता पराभव झाला व विजयसिंह मोहिते- पाटलांना खासदारकीची लॉटरी लागली. परंतू 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी दहा वर्षानंतर माढ्याच्या आखाड्यात पुन्हा शड्डू ठोकला. परंतू माढ्याचे गणित आपले राजकारण संपवू शकते, ही भीती मनात निर्माण झाल्यामुळे तसेच फलटणच्या सभेत फलटण नरेशांच्या साक्षीने घेण्यात आलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात माण-खटावमधील राष्ट्रवादीचे तथाकथित नेते शेखर गोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या राड्याचा अपशकुन मानून शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली. 

शेवटी राष्ट्रवादीतून माढ्यातून कोण लढणार, यासाठी उमेदवारांची चाचपणी झाली. शेवटी भाजपचेच टेकू असलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे यांना ओढून ताणून उमेदवारी देण्यात आली. इकडे भाजपनेही फिल्डिंग लावली. थेट सातारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनाच भाजपने गळाला लावले. माण-खटावमधून आ. जयकुमार गोरे, शेखर गोरे, माळशिरसमधून विजयसिंह मोहिते-पाटील, करमाळ्यातून आ. नारायण पाटील, धनगर नेते उत्तमराव जानकर अशा दिग्गजांची मोट बांधून भाजपनेही राष्ट्रवादीची पारंपारिक माढ्याची गढी काबिज करण्यासाठी फिल्डिंग लावली. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला विरुद्ध भाजपची मुसंडी, असे चित्र निवडणूक प्रचारादरम्यान माढा मतदारसंघात दिसत होते. उद्या माढ्याची गढी राष्ट्रवादी राखणार, की भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर ही गढी काबिज करणार, याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शरद पवारांसह फलटण नरेशांचे राजकारणही माढ्याच्या निकालावर अवलंबून आहे. मात्र कोण कोणाला आस्मान दाखवतंय, हे उद्या रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होणार आहे. सातारा व माढा लोकसभा मतदारसंघातून स्थानिक भूमिपुत्र बाजी मारणार याबाबत संपूर्ण सातारकरांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे.


Sagar Rajendra Chavan

Jay bhim Jay lahuji


धोम व कण्हेर धरणग्रस्तांचा आता थेट जलाशयात साखळी आंदोलनाचा इशारा

धोम व कण्हेर धरणासाठी शेकडो शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या पण, पुनर्वसनासाठी त्यांना आजही संघर्ष करावा लागत आहे. त्याचाच भाग म्हणून थेट धोम जलाशयात उतरून आंदोलन करण्याचा इशारा जनजागर प्रतिष्ठानचे जिल्हा समन्यवक देवराज देशमुख व श्रीहरी गोळे यांच्यासह

9 hours before

शाहूनगरमधील घुले बंधूंमुळे वाचले भेकराचे प्राण

अजिंक्यतारा किल्ल्यालगतच्या जंगलातून एक भेकर शाहूनगर परिसरात आले होते. त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चवल्याने ते गंभीर जखमी झाले. या भेकराला शाहूनगर येथे राहणार्‍या संतोष घुले आणि प्रकाश घुले या दोघांनी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले आणि त्याचे

9 hours before

मर्सिडीज-बेन्झतर्फे द्वितीय आणि तृतीय श्रेणी बाजारपेठांवर सातत्याने भर

मर्सिडिज-बेन्झ या भारतातील सर्वात मोठ्या लक्झ्युरी कार उत्पादक कंपनीने महाराष्ट्रातील आपले विश्वासार्ह भागीदार बी.यू. भंडारी मोटर्स यांच्या साह्याने आपल्या मसर्विस ऑन व्हील्सफ या नाविन्यपूर्ण ग्राहक सेवेच्या दुसर्‍या टप्प्याचा शुभारंभ केला.

9 hours before

राज्य सरकारच्या माध्यमातून उत्तर माण, टेंभूचा प्रश्न मार्गी लागेल

टेंभुच्या पाण्याचा बुडबुडाही माणपर्यंत येऊ शकणार नाही म्हणणा-यांना आम्ही टेंभूचे पाणी माण तालुक्यात आणून दाखवले आहे. आता उत्तर माणला जिहे - कटापूर योजनेतून आंधळी धरणातून पाणी उचलून देणे आणि टेंभू योजनेतील उर्वरित गावांना पाणी मिळण्यासाठी

9 hours before