06:34pm | Sep 19, 2019 |
सातारा : आम आदमी पार्टी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र समिती सदस्य सागर भोगावकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात असे म्हटले आहे की, आम आदमी पार्टीचे संस्थापक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रातील येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ताकदीने लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यातही आम आदमी पार्टीचे मोठे काम आहे. विविध आंदोलने तसेच भ्रष्टाचाराविरोधात वेळोवेळी आम आदमी पार्टीने शाषित, वंचित, पीडितांना न्याय देण्याची भूमिका घेतली होती. याच आधारावर आम आदमी पार्टीने सातारा शहरासह ग्रामीण भागातही आपले वलय निर्माण केले आहे. या वलयाचा निश्चितपणे सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत तसेच विधानसभेला मदत होणार आहे. आम आदमी पार्टीची दिल्लीमध्ये सत्ता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या विकासकामांच्या माध्यमातून दिल्लीला विकासाच्या एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. जर येणार्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला राज्यात बहुमत मिळाले तर आम आदमी पार्टी राज्यात विकासाचा डोंगर उभा करेल. सातारा जिल्ह्यात येवू घातलेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार आम आदमी पार्टीच्यावतीने महाराष्ट्र राज्य प्रचार समिती अध्यक्ष तथा शेतकरी नेते रंगा राचुरे तसेच आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र समिती सदस्य सागर भोगावकर, तसेच श्रीकांत आचारे, सुदर्शन कदम, सागर पाटील यांनी केलेला आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |