बिजवडी : बोथे ता. माण येथील बोथे विंड मिल या पवनचक्की प्रकल्पाकडे जाण्यासाठी जबरदस्ती करुन धमकावणे व शिवीगाळ करुन जमीनीतुन रस्ता काढल्या प्रकरणी दहिवडी न्यायालयाने शेखरभाऊ गोरे व अन्य दोघांना 16 ऑक्टोंबर 2018 रोजी 3 वर्षे शिक्षा व 11 हजार 500 रुपये दंड दहिवडी न्यायालयाने ठोठावला होता.या शिक्षेविरोधात शेखरभाऊ गोरे यांनी अति.जिल्हा सत्र न्यायालय वडूज यांच्याकडे अपील केले होते.या अपीलात न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी शेखरभाऊ गोरे यांच्यासह दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी , माण खटाव तालुक्यातील युवा नेते शेखरभाऊ गोरे व अन्य दोघांवर बोथे येथील पवनचक्की प्रकल्पाकडे जाण्यासाठी कस्तुरा घाडगे यांच्या जमीनीतुन जबरदस्तीने दमदाटी व शिवीगाळ करुन रस्ता केल्या प्रकरणी दहिवडी पोलीस स्टेशनला दि.9 फेब्रुवारी 2013 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. दहिवडी पोलीस स्टेशनकडून सदर घटनेचा तपास करून दहिवडी कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.यात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर दहिवडी न्यायालयाचे न्यायाधीश ए.आर. मोहने यांनी शेखरभाऊ गोरे व अन्य दोघांना दि.16 ऑक्टोंबर 2018 रोजी 3 वर्ष शिक्षा व 11हजार 500 रुपये दंड केला होता. त्यावेळी शेखरभाऊ गोरे यांनी या शिक्षेविरोधात जाण्याचा निर्णय घेत अपील करण्यासाठी जामीन मंजुर व्हावा अशी मागणी केली होती.त्यावेळी त्यांना दहिवडी न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता.त्यानंतर शेखरभाऊ गोरे यांचेवतीने या शिक्षेच्या विरोधात वडुज अति.जिल्हा सत्र न्यायालयात दिनांक 29 ऑक्टोंबर 2018 रोजी अपील दाखल केले होते.या अपीलात शेखरभाऊ गोरे यांच्यावतीने अँड.एन.एम.गोडसे व एन.टी.शिंगाडे
यांनी सबळ पुराव्याद्वारे युक्तीवाद मांडला होता.हा युक्तीवाद ग्राह्य धरत त्याची सुनावणी होऊन आज दिनांक 18 जून 2019 रोजी वडुज सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी शेखरभाऊ गोरे यांच्यासह दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे.
शेखरभाऊ गोरे यांची बोथे प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्याचे वृत्त माण खटाव तालुक्यात समजताच शेखरभाऊ गोरे प्रेमी कार्यकर्ते व जनतेकडून फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास...
बोथे पवनचक्की प्रकल्पाकडे जाणार्या रस्त्याच्या कामावेळी फिर्यादी घाडगे यांनी त्यांचा रस्त्याशी काही संबंध नसताना राजकीय द्वेषापोटी विनाकारण त्रास देण्याच्या हेतूने माझ्यावर दहिवडी पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. या तक्रारीविरोधात सबळ पुरावे देऊनही दहिवडी न्यायालयाने माझ्याविरोधात शिक्षेचा निकाल दिला होता. तरीही माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असल्याने मी वडूज अति.जिल्हा सत्र न्यायालयाकडे अपील केले होते. वडूजच्या न्यायालयात न्यायदेवेतेने मला न्याय दिला असून माण खटावच्या जनतेच्या आशीर्वादाची साथ लाभत मला या प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळाली आहे, असे शेखरभाऊ गोरे यांनी सांगितले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |