01:37am | Jul 30, 2018 |
फलटण : धनगर समाजाच्या एस.टी.आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी निर्णायक लढा उभा करण्यासाठी तसेच सोलापूर विद्यापिठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करण्यात यावे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळास आर्थिक तरतूद करण्यात यावी इत्यादी मागणीसाठी फलटण तालुक्यातील तमाम धनगर समाज बांधवाच्या वतीने दि. २९ पासून तहसिलदार कार्यालयासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
२०१४ रोजी बारामती येथे धनगर समाजाने मोठ्या प्रमाणावर आरक्षणाचा लढा उभा केला होता. समाजातील काही युवक ९ दिवस आमरण उपोषणास बसले होते.त्या उपोषणाची सांगता करण्यासाठी तत्कालिन भाजपाचे प्रदेश अध्यक्ष व आजचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस हे उपस्थित राहून धनगर समाजास आरक्षण देवू, तो तुमचा घटनात्मक अधिकार आहे असे सांगितले होते. त्यानंतर सोलापूर आणि बारातमीच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर समाज खूप मागास आहे, त्यांना आरक्षणाची गरज आहे आणि ते एस.टी. चे आरक्षण आम्ही देणारच, ही भूमिका मांडली होती. नंतर महाराष्ट्रात जे सत्ता परीवर्तन झाले ते धनगर समाजामूळे व मला पदही मिळाले तेही धनगर समाजामूळेच. अशी भूमिका नागपूर मोर्चात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती.
आमचे सरकार आल्यावर मंत्रिमंडळाच्या पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देवू असे आश्वासन दिले होते. आज चार वर्षात शेकडो कॅबिनेटच्या मिटिंग झाल्या तरी आरक्षणाची अंमलबजावणी केली जात नाही. त्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. आजअखेर त्यांनी धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याशिवाय काहि केले नाही जर तात्काळ आरक्षण दिले नाही तर या नाकर्ते सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय धनगर समाज राहणार नाही.आपण किती म्हंटले तरी कोणतीच गोष्ट सहज व ताकत दाखविल्याशिवाय मिळत नाही सरकारला नमविण्याची हिच योग्य वेळ आली आहे. त्यामध्ये आपण कमी पडत आहे. धनगर समाजाची बारामती, सोलापूर, माढा, बीड, सांगली, कोल्हापूर, सातारा, नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, हातकणंगले या मतदार संघांसह राज्यातील अनेक लोकसभा व विधानसभा मतदार संघांत लक्षणिय लोकसंख्या आहे. याची जाणीव राज्यसरकारने ठेवावी. धनगर समाजामध्ये आलेली मरगळ व शिथिलता संपवून धनगर समाजाने या धरणे आंदोलनासाठी मोठ्या संख्येने हजर रहावे असे आवाहन धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |