खंडाळा : अंदोरी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये आई- वडिलांना बैलगाडीच्या गाडीच्या चाकाची आर कुठे ठेवली आहे असे म्हणत लाकडी दांडक्याने व सळईने मारहाण करीत जखमी केल्याप्रकरणी मुलास व सुनेला खंडाळा न्यायालयाने दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे . याप्रकरणी नानासो सुरेश तांबे, शितल नानासो तांबे अशी शिक्षा सुनावलेल्या मुलाचे व सुनेचे नाव आहे.
याबाबतची मिळालेली माहिती अशी, अंदोरी ता.खंडाळा लीलाबाई सुरेश तांबे ह्या आपल्या कुटुंबीयांसवेत राहण्यासाठी आहे. दरम्यान, लीलाबाई तांबे ह्या ७ नोव्हेंबर २०१६ रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घरी पती सुरेश तांबे यांच्यासमवेत असताना मुलगा नानासो सुरेश तांबे हा त्याठिकाणी येत बैलगाडीच्या गाडीच्या चाकाची आर कुठे ठेवली आहे असे म्हणत शिवीगाळ करू लागला. यावेळी सुरेश तांबे व लीलाबाई तांबे यांनी मुलगा नानासो तांबे याला आम्हाला शिवीगाळ का करीत आहे अशी विचारणा केली असता नानासो तांबे याने वयोवृद्ध असणाऱ्या सुरेश तांबे व लीलाबाई तांबे यांना लाकडी दांडक्याने गुरासारखे मारहाण करत जखमी केले. यावेळी नानासो तांबे हा परत घरात जाऊन लोखंडी सळई आणत नानासो तांबे व शितल तांबे यांनी लीलाबाई तांबे यांना जबर मारहाण करीत जखमी केले होते.
त्यानुसार लोणंद पोलीस स्टेशनला लीलाबाई तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी लोणंद पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस हवालदार आप्पा कोलवडकर यांनी तपास करत खंडाळा येथील न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. यावेळी खंडाळा येथील न्यायालयामध्ये सुनावणी होत दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश अजित बी.चव्हाण यांनी सरकारी वकील सुप्रिया मोरे-देसाई यांनी सादर केलेले पुरावे व युक्तिवाद मान्य करत न्यायाधीश अजित बी. चव्हाण यांनी मुलगा नानासो तांबे व सून शितल तांबे यांना दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद शिक्षा सुनावली आहे. याकामी सरकारी वकील सुप्रिया मोरे-देसाई यांना प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलीस हवालदार सुनील गायकवाड ,सुरेश मोरे , रवींद्र कदम यांनी सहकार्य केले.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |