कराड : पोलिस गणवेश परिधान करत सहायक पोलिस निरीक्षक असल्याची बतावणी करणार्या वडगाव हवेली (ता. कराड, सातारा) येथील नीलेश सुरेश चव्हाण (वय 26) या तोतया पोलिस अधिकार्यास कराड शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. सातारा शहरासह कराड, सांगली, पाचवड भागांत त्याचा वावर होता. त्यामुळेच त्याने कोणाची फसवणूक तर केली नाही ना? याचा कराड पोलिस शोध घेत आहेत.
नीलेश चव्हाण हा सोमवारी दुपारी कराडमधील कोल्हापूर नाका परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यानजीक उभा होता. त्यावेळी पोलिस ड्रेस परिधान केलेला चव्हाण काही लोकांना आपण पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करत होता. याबाबतची माहिती कराड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक हणमंत गायकवाड यांना समजली. त्यानंतर त्यांनी तानाजी शिंदे व प्रफुल्ल गाडे या दोघा पोलिस कर्मचार्यांना त्वरित कोल्हापूर नाका परिसरात पाठवले.
यावेळी शिंदे व गाडे यांनी चव्हाणकडे विचारणा केली असता तो गडबडला. त्यानंतर त्वरित त्याला ताब्यात घेत कराड शहर पोलिस आणण्यात आले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सायंकाळपर्यंत कराड शहर पोलिस ठाण्यात सुरू होती.
दरम्यान, संशयित तोतया पोलिस चव्हाण हा सातारा शहर, कराड शहर, सांगली जिल्ह्याच्या विविध भागात पोलिस अधिकारी म्हणून फिरत होता, अशी धक्कादायक माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. पोलिस गणवेश घालून फिरणे आपणास आवडत होते, असे चव्हाण पोलिसांना सांगत आहे. त्याने काही लोकांनाकडून पैसे उकळल्याचीही माहिती समोर येत असून पोलिस या माहितीची शहनिशा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत करत होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |