02:27am | Mar 23, 2018 |
सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्यावर अखेर एका महिलेने घरकुल व शौचालय योजनेचे अनुदान देण्याचे आमीषाने घरी बोलावून बलात्कार केल्याप्रकरणी अखेर आज सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आज सकाळी सातारा टुडे ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
यानंतर आनंद भंडारी यांनी सातारा टुडे कार्यालयात फोन करुन याबाबत आपली बाजू मांडून याबाबत खुलासा केला होता. यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सातार्यात येवून सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांना धारेवर धरुन याबाबत गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. सुमारे चार महिन्यांपासून हा विषय संबंधित महिलेने सातारा पोलिसांकडे अर्जाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला होता. परंतू सातारा पोलिसांना याबाबत ठोस पुरावे मिळत नसल्याने आजपर्यंत पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केलेला नव्हता.
परंतू संबंधित पीडीत महिलेने 20 मार्च रोजी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांची भेट घेवून सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) आनंद भंडारी यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असा तक्रारअर्ज दिला होता. तसेच गुन्हा दाखल न झाल्यास 23 मार्च रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशाराही दिला होता. परंतू पोलिसांना याविषयात गुन्हा दाखल करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. परिस्थितीजन्य पुरावे मिळत नसल्यामुळे सातारा शहर पोलीसही बुचकळ्यात पडले होते. आज सकाळी सातारा टुडे ने या विषयासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी याबाबत सातारा टुडे कार्यालयात संपर्क करुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. आज सायंकाळी संबंधित पीडीत महिला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कार्यकर्त्या महिलांसह सातारा शहर पोलीस ठाण्यात धडक देत आनंद भंडारी यांच्यावर लैंगिक शोषण प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आग्रही मागणी केली होती. त्यामुळे सातारा पोलिसांना नाईलाजाने अखेर गुन्हा दाखल करुन घ्यावा लागला आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सातारा टुडे कडे आपण निर्दोष असल्याबाबतचे स्पष्टीकरण दिले होते. माझ्या विरोधात काही लोकांनी संगनमत करुन हे षडयंत्र रचलेले आहे, असे ते म्हणाले होते. परंतू तृप्ती देसाई यांनी सातार्यात येवून शहर पोलिसांना हिसका दाखवल्यामुळे अखेर पोलिसांनीही नरमाईचे धोरण स्विकारुन याबाबत भंडारींवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर करीत आहेत.
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |