सातारा : जाधववाडी, ता. फलटण येथील एका दुकानासमोर सामाजिक अंतर न ठेवता दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या ग्राहकांना सामाजिक अंतर ठेवा, असे सांगितल्याने चिडून जावून शासकीय सेवकास बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जाधववाडी, ता. फलटण येथे दीपक मुळीक यांचे किराणा मालाचे दुकान आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जिवनावश्यक वस्तूंची खरेदी करीत असताना सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे. त्यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी सातारा यांनी पारित केलेले आहेत. असे असताना आज सकाळी मुळीक यांच्या दुकानासमोर गणेश जाधव (वय 26 रा. जाधववाडी) या पाणी पुरवठा कामगारास लोकांची गर्दी दिसली. यावेळी जाधव यांनी दुकानदार मुळीक यांना ग्राहकांना सामाजिक अंतर ठेवून उभे करण्यास सांगितले. तसेच गर्दीमध्ये उभ्या असलेल्या सागर भंडलकर व एक अनोळखी इसम (दोघे रा. गोळेगाव पु.) यांना यावेळी जाधव यांनी सामाजिक अंतर ठेवून उभे राहण्यास सांगितले. यामुळे या दोघांनी चिडून जावून गणेश जाधव यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यानंतर जाधव यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण करुन मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दिली असून या दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक बनकर करीत आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |