मुंबई:
छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस मराठी' हा रिअॅलिटी शो गाजवत असलेला साताऱ्यातील स्वयंघोषित राजकीय नेता अभिजीत बिचुकले याला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. एका जुन्या चेक बाउन्स प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 'बिग बॉस'च्या घरात जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
बिचुकले हा 'बिग बॉस'मधील सर्वाधिक चर्चित स्पर्धक आहे. 'बिग बॉस'च्या घरातील अन्य स्पर्धकांसोबत त्याचे रोजच्या रोज वाद झडत होते. स्वत:ला महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणवून घेणारा बिचुकले त्याच्या विरोधात काहीही सहन करण्याच्या मनस्थितीत नसायचा. अन्य स्पर्धकांशी तो नेहमीच चढ्या आवाजात वाद घालताना दिसायचा.
अलीकडंच बिचुकलेनं शोमधील एक स्पर्धक रुपाली भोसले हिच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यावरून बराच गदारोळ झाला होता. महिला वर्गात याचे तीव्र पडसाद उमटले. भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन बिचुकलेला 'बिग बॉस'च्या बाहेर काढण्याचे आदेश द्या, अशी विनंती केली होती.
हे सगळं सुरू असतानाच चेक बाउन्स प्रकरण उजेडात आलं. त्याच्या विरोधात साताऱ्यातील स्थानिक न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यानंतर सातारा पोलिसांनी बिचुकलेच्या अटकेसाठी थेट मुंबई गाठली आणि त्याला बेड्या ठोकल्या. त्याला उद्या न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे.
अटकेमुळं बिचुकलेची 'बिग बॉस'मधील इनिंग संपणार की तो पुन्हा एन्ट्री घेणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
'बिग बॉस मराठी' विषयी वाचा सर्व काही एकाच क्लिकवर
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |