02:48am | Nov 22, 2019 |
कराड : सहयाद्रि सहकारी साखर कारखाना संचलित, सहयाद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन आणि सहयाद्रि सहकारी साखर कारखान्याच्या 46 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी केंद्रीय कृषी मंत्री मा.खा. शरद पवार यांच्या शुभहस्ते व सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल, विद्यमान खा.श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्राचे आ.पृथ्वीराज चव्हाण, आ.अजितदादा पवार, विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिलीप वळसे.पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील, पा्र.डॉ.एन.डी.पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सोमवार दि. 25 नोव्हें रोजी दु. 2 वाजता कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेला आहे. आशी माहीत आ.बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आ. पाटील म्हणाले, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शेती उद्योगाला अधिक विकसित करणारे तंत्रज्ञान व संशोधन यासाठी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय आवश्यक असल्याचा मनोदय संस्थापक स्वर्गीय आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांनी वेळोवेळी व्यक्त केला होता.तसेच कारखान्याच्या सभासदांचीही मागणी होती. याचा विचार करुन कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय झाला. हे महाविद्यालय सुरु झाल्यानंतर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकर्यांच्या मुलांना शिक्षण मिळून ते उच्चशिक्षित अभियंते व संशोधक तयार होतील. याशिवाय शेतकर्यांच्या मुलांनी कृषी विषयक उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये अशा उदात्त हेतूने कारखान्याच्या संचालक मंडळाने दि. 7 एप्रिल, 2012 रोजी कारखाना कार्यस्थळावर कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
शासनाकडून कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर कारखाना कार्यस्थळावरील यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या इमारतीमध्ये सन 2013. 2014 या शैक्षणिक वर्षापासून सहयाद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यात आले.
सद्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता प्रतिवर्षी 40 इतकी असून, ती वाढविण्याचे संचालक मंडळाचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचबरोबर कृषी अभियांत्रिकी शाखेशी संलग्न अभ्यासक्रम सुरु करण्याच्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येणार आहे. सन 2019.20 हे सातवे शैक्षणिक वर्ष आहे .आतापर्यंत महाविद्यालयातून 3 बॅचेस् उत्तीर्ण झालेल्या आहेत.
सहयाद्रि सहकारी साखर कारखान्याचा हा 46 वा गळीत हंगाम असून कारखान्याकडे या हंगामासाठी एकूण 21467 हेक्टर क्षेत्रावरील ऊसाची नोंद गळीतीसाठी झालेली आहे. यामध्ये आडसाली 5338 हेक्टर, पूर्वहंगामी 2718 हेक्टर, सुरु 1546 हेक्टर व खोडवा 11865 हेक्टर असा समावेश आहे. मागील हंगामाच्या तुलनेत आडसालीचे क्षेत्र 2000 हेक्टरने कमी झालेले आहे. व खोडवा क्षेत्रामध्ये 3300 हेक्टरनी वाढ झाली आहे.
कारखान्याच्या आसवनी विभागामध्ये सध्याच्या प्रतिदिन 45000 लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीटपासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी वाढीव मशिनरी, इथेनॉल स्टोअरेज टाक्या व सुरक्षा यंत्रणा उभारणी आाणि सिव्हील कामे प्रगतीपथावर असून येत्या काही दिवसांत ती सर्व कामे पूर्ण होतील. त्यानंतर सरकारी उपक्रमातल्या तेल कंपन्याबरोबर इथेनॉल खरेदीचा करार होताच इथेनॉलचे उत्पादन घेण्यात येणार आहे.
तसेच कारखान्याच्या आसवनी विभागाकडे प्रतिदिन 1 लाख लिटर्स इथेनॉल उत्पादनाचा नवीन स्वतंत्र प्रकल्प उभारण्याकरीता डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डिपीआर) तयार करण्याचे काम नॅशनल फेडरेशन ऑफ को.शुगर फॅक्टरीला, नवी दिल्ली यांचकडे सोपविण्यात आलेले आहे. सदरचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. कारखान्याची गळप क्षमता प्रतिदिन 7500 मे. टनावरुन 11000 मे. टनापर्यंत वाढविण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाचे प्रयत्न सुरु आहेत.
कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतींचे उद्घाटन आणि कारखान्याच्या 46 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ समारंभासाठी अनेक मान्यवंराची उपस्थिती लाभणार आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |