कोल्हापूर : बर्फाच्छादित प्रदेशातील रक्त गोठविणारा गारठा अशा प्रतिकूल वातावरणात अनोळखी गावातील रस्त्यावरून सायकल प्रवास, चढ-उताराच्या रस्त्यावरून धावण्याची स्पर्धा आणि थंडगार पाण्यात पोहणे अशा जगभरातील निवडक नामवंत स्पर्धकांशी मुकाबला करायला लावणार्या ‘वर्ल्ड आयर्न मॅन’ स्पर्धेत क्रीडानगरी कोल्हापूरच्या तब्बल 15 मावळ्यांनी बाजी मारली. रविवारी युरोपातील ऑस्ट्रिया येथे झालेल्या या स्पर्धेचे खडतर अंतर निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण करत कोल्हापूरच्या मावळ्यांनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकावला.
चार कि. मी. जलतरण, 180 कि.मी. सायकलिंग आणि 42 कि.मी. धावणे अशी कस लावणारी ही स्पर्धा होती. बर्फाच्छादित प्रदेश, मायनस डिग्री तापमान अशा वातावरणात 18 ते 99 वयोगटासाठी ट्रायथलॉन स्पर्धा आयोजित केली जाते. यात जगभरातील सुमारे 50 देशातून तीन हजारांवर पुरुष व महिला स्पर्धक सहभागी झाले होते. चार कि.मी. पोहणे,
42 कि.मी. धावणे आणि 180 कि.मी. सायकलिंग असे या स्पर्धेचे स्वरूप होते. प्रत्येक स्पर्धकाने हे संपूर्ण अंतर 17 तासांत पूर्ण करणेआवश्यक होते. त्यातही पुन्हा पोहण्यासाठी 2 तास 20 मिनिटे, धावण्यासाठी सात तास आणि सायकलिंगसाठी 8 तास 30 मिनिटे अशी वेळ बंधनकारक होती. पोहणे व सायकलिंग प्रकाराची स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 10 तास 20 मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. ही स्पर्धा फत्ते करण्यासाठी कोल्हापूरच्या अॅडव्हेंचरपटूंनी गेली वर्षभर तयारी सुरू ठेवली होती. कोल्हापूर स्पोर्टस् क्लबच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचा कसून सराव करण्यात आला.
कोल्हापूरच्या टीमने प्रत्यक्ष स्पर्धेत आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी करत भरघोस यश मिळविले. स्पर्धा यशस्वीरीत्या पार करून ‘वर्ल्ड आयर्न मॅन’चा किताब पटकावणारे खेळाडू, कंसात त्यांनी नोंदविलेली वेळ (तास, मिनिटे, सेकंद) : आदित्य शिंदे (10:52:45), रौनक पाटील (14:04:20), आशिष तंबाके (14:40:08), स्वप्निल माने (14:48:58), उदय पाटील (15:33:05), डॉ. प्रदीप पाटील (15:32:26), डॉ. संदेश बागडी (15:29:21), डॉ. विजय कुलकर्णी (15:31:43), विनोद चंदवाणी (15:32:26), महेश मेठे (15:58:45), विशाल कोथळे (15:58:45). याशिवाय चेतन चव्हाण (कोल्हापूर), सत्यवान नणावरे व बलराज पाटील (इचलकरंजी) यांचा समावेश आहे. टीमला ‘आयर्न मॅन’ वैभव बेळगावकर आणि आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील, जलतरण तलावाचे प्रशिक्षक निळकंठ आखाडे, अश्विन भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |