11:53pm | May 28, 2019 |
कराड : कोल्हापूर नाक्यावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब होऊन बसली आहे. यामुळे अनेकांना त्याचा त्रास होत असून अपघाताचे प्रमाण वाढले होते. याची दखल घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी मंगळवार दि. 28 रोजी दुपारी कराडला भेट देऊन कोल्हापूर नाक्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी ट्रॅव्हल्समुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाक्यावर उभा राहणाऱ्या ट्रॅव्हल्सला पर्यायी जागा देण्यासंदर्भात विचारविनिमय केला. याबाबत त्यांनी प्रवाशांसह व्यवसायिकांशी चर्चा केली.
यावेळी कराडचे डीवायएसपी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक ज्योतीराम पाटील, कराड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, सपोनि स्वप्नील लोखंडे, यांच्यासह सतीश भोंगाळे प्रमुख उपस्थित होते.
येथील कोल्हापूर नाक्यावर कोल्हापूर ते पुणे जाणाऱ्या लेनवर खाजगी प्रवासी वाहतुकीसह ट्रॅव्हल्स उभा राहत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. याबाबत अनेक वेळा तक्रार करून देखील त्याची योग्य ती दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे कोल्हापूर नाक्यावर छोट्या-मोठ्या अपघातांची संख्या वाढली होती. रस्त्यावरच वाहने उभा करून प्रवासी घेतले जात असल्याने मोठ्या अपघाताचा धोका वाढला होता. याबाबत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व प्रवाशांच्या तक्रारींची जिल्हा पोलिस प्रमुखांनी दखल घेतली. त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार धीरज पाटील मंगळवारी कराडला आले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी शहर पोलिस ठाण्यात बैठक बोलावली. या बैठकीमध्ये धीरज पाटील यांनी पोलिसांबरोबरच कोल्हापूर नाक्यावरील स्थानिक व्यवसायिक व ट्रॅव्हल्स व्यवसायिकांचे म्हणणे ऐकून घेतले. कोल्हापूर नाक्यावर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.
पाहणी करत असताना सर्व्हिस रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढल्यास कोल्हापूर नाक्यापासून पुढे व पाटील पेट्रोल पंपाच्याजवळ, किंबहुना वारुंजी फाट्यावर अन्यथा पंकज लॉनच्या बाजूला ट्रॅव्हल्स उभा करण्यासाठी पर्यायी जागा दिल्यास कोल्हापूर नाक्यावरील वाहतूक कोंडी फुटू शकते. कोल्हापूर नाक्यावर उभा राहणाऱ्या ट्रॅव्हल्स तेथून हलविल्या नाहीतर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही, हेही अनेकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पाहणी दरम्यान ट्रॅव्हल्स व खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने नेमकी कुठे उभी केल्यानंतर कोल्हापूर नाक्यावरील वाहतुकीची समस्या सुटू शकते याचा अभ्यास करून पर्याय काढला जाणार आहे.
सर्व्हिस रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करा..
कोल्हापुर ते पुणे लेनवर सर्व्हिस रस्त्यावरील टपऱ्या तसेच झालेली अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात धीरज पाटील यांनी पोलिसांना सूचना केल्या. त्याच वेळी त्यांनी या सर्व्हिस रस्त्यावर उभा राहत असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे सपोनि संभाजीराव गायकवाड यांना दिले. तसेच महामार्गावर कोणत्याही परिस्थितीत एसटी उभा राहू नये, याबाबत योग्य ती काळजी घ्यावी अशा सूचना एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे कोल्हापूर नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याबाबत व्यावसायिक व प्रवाशांशी चर्चा केली असून रस्त्यावर उभा राहणाऱ्या ट्रॅव्हल्सला पर्यायी जागा देण्यासंदर्भात विचार सुरू आहे.
-धीरज पाटील,
अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सातारा
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |