कराड : विनापरवाना डिजीटल फलक लावून गावाचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी प्रविण काकासो पाटील ऊर्फ पीके याच्यावर वेगवेगळे चार गुन्हे दाखल केले. ग्रामपंचायतीची परवानगी न घेता वाढदिवसाचे फलक लावल्याने पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी महाराष्ट्र विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत कारवाई केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रविण पाटील ऊर्फ पीके याच्या वाढदिवसाचा फलक ग्रामपंचायतीची परवानगी न घेता कार्वे येथील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाच्या बाजुला लावला होता. त्यानंतर कार्वे विकास सोसायटीच्यासमोरही एक फलक लावला होता. त्याच परिसरात आणखी एक फलक लावलेला होता. शिवाजी चौकात चार ते पाच फलक विनापरवाना लावण्यात आले होते. कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर, पोलीस हवालदार तारळकर, हवालदार अमोल पवार, संजय काटे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना हे विनापरवाना फलक दिसले. क्षीरसागर यांनी फलकाच्या परवानगीची चौकशी केली असता परवानगी नसल्याचे समोर आले. महाराष्ट्र विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत प्रविण पाटीलसह त्याचा फलक लावणाऱयांवर गुन्हा दाखल केला. वाढदिवसानिमित्त मोठमोठे डिजीटल फलक लावण्याचे फॅड आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही वाढले असून यातून वर्चस्ववाद पेटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पोलिसांनी डिजीटल फलक बहाद्दरांवर कारवाईची मोहिम सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी केलेल्या कारवाईमुळे फलकबहाद्दरांच्यात खळबळ उडाली असली तरी सर्वसामान्यातून कारवाईचे स्वागत होत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |